स्वच्छता अभियानाने शहरात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 20, 2022

स्वच्छता अभियानाने शहरात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी.

 स्वच्छता अभियानाने शहरात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी.

आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचा गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नगर शहरात उपक्रम.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सार्वजनिक स्वच्छतेचे आग्रही असणार्‍या व त्यासाठी स्वतः खराटा चालवून गाव झाडून घेणार्‍या संत गाडगेबाबा यांना त्यांच्याच नावाच्या छात्रालयातील विद्याथ्र्यांनी शहरातील माळीवाडा व स्वास्तिक पुणे) एसटी बसस्थानक व परिसराची स्वच्छता करून पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली. शहरातून त्यांनी काढलेल्या स्वच्छता फेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाजवळ शेवगावच्या आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे  संत गाडगेमहाराज छात्रालय आहे. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त तेथील विद्यार्थ्यांनी आज त्यांचाच सार्वजनिक स्वच्छतेचा मूलमंत्र आचरणात आणला. गाडगेमहाराजांच्या वेशभुषेतील एका विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सहकार सभागृहापासून सुरूवात करून शहराच्या  फेरी बंगाल चौकी, क्रिस्त गल्ली, कापड बाजार, कोर्ट गल्ली, माळीवाडा वेस माळीवाडा बस स्थानक,पुणे बस बुरुडगाव रोड,आनंद धाम, महात्मा फुले चौक मार्केट यार्ड अशा प्रमुख भागातून स्वच्छता फेरी काढली.
स्वच्छता फेरीतील विद्यार्थी फेरी सुरू असतानाच काही विद्यार्थी हातात झाडू घेऊन बघताबघता परिसर स्वच्छ करून टाकत. त्याचवेळी अन्य काही विद्यार्थी गाडगेबाबांचे आवडते ’गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन ढोल ताशा टाळ-पखाद मृदुंगाच्या तालावरती गात होते. ही फेरी शहरात चर्चेचा व आकर्षणाचा विषय झाली. फेरी संपल्यावर छात्रालयाच्या आवारात पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला.
संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड  शिवाजीराव काकडे यांच्या पेरणेने संस्थेच्या सर्व विद्यालयामध्ये गाडगे महाराजांची पुण्यतिथी याच पद्धतीने साजरी केली जाते विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार हवेत ह्याच उद्देशाने असल्याचे ते म्हणाले वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना हिवाळा लागल्यामुळे डिंक लाडू किटचे  वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे पहाटे उठून व्यायाम करावा यासाठी आरोग्य चांगले राहते असे विविध  उपक्रम अ‍ॅड शिवाजीराव काकडे यांनी सुरू केले आहेत. यावेळी संत गाडगे महाराज छात्रलयाचे अधीक्षक बाबासाहेब पातकळ राष्ट्रीय पाठशाळेचे शिक्षक सतीश काळे, संजय सकट, संभाजी आठरे, कविराज बोटे, तुकाराम विघ्ने यावेळी  स्वास्तिक बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अरुण दळवी, श्रीनिवास शर्मा, विनायक तांबोळी, सुरक्षा रक्षक दत्तात्रय भापकर बाबासाहेब पाटोळे फेरीचा समारोप राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल व संत गाडगे महाराज छात्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिताराम काकडे व प्रमुख पाहुणे विशाल पांडे ,संत गाडगे महाराज अधीक्षक  बाबासाहेब पातकळ यावेळी संस्थेतील विकास गवळी, मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे,बाबासाहेब लोंढे,सौ.मनीषा कोळगे,प्रविण उकिर्डे आबासाहेब बेडके,सुशील नन्नवरे,राहुल लबडे विजय वाणी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment