ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सुसाट, राष्ट्रवादी दुसर्‍या तर ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 20, 2022

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सुसाट, राष्ट्रवादी दुसर्‍या तर ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर.

 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सुसाट, राष्ट्रवादी दुसर्‍या तर ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर.


मुंबई ः
राज्यात नुकत्याच झालेल्या 7 हजार 751 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत 4 हजार 936 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकावर असून भाजपाने 1580, राष्ट्रवादीने 990, शिंदे गटाने 663, काँग्रेसने 647, ठाकरे गटाने 517  ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना, भाजपा आणि शिंदे शिवसेना या पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. सत्तांतर झाल्यानंतरची ही स्थानिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक आहे. यामुळे कोणाचा वरचष्मा असणार यावरून त्या पक्षाची ताकद समजणार आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडीत गाठले असून ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने मोठी झेप घेतली आहे. याच दरम्यान आता भाजपाने नंबर वन आम्हीच असल्याचा दावा केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी तिन्ही पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. भाजपाचे प्रचंड यश. आतापर्यंत आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात भाजपाची जोरदार मुसंडी इतर तीन पक्ष मिळूनही भाजपा इतकी संख्या होत नाही. निकाल अजून येत आहे.

No comments:

Post a Comment