चायना मांजा व प्लास्टिकवर दंडात्मक कारवाई सुरू करा ः आयुक्त डॉ. जावळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 20, 2022

चायना मांजा व प्लास्टिकवर दंडात्मक कारवाई सुरू करा ः आयुक्त डॉ. जावळे

 मनपा स्वच्छता अभियानात अधिकारी कर्मचारी होणार सहभागी

चायना मांजा व प्लास्टिकवर दंडात्मक कारवाई सुरू करा ः आयुक्त डॉ. जावळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्यावतीने महिन्याच्या तीस तारखेला मनपाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये आता महापालिकेचे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहे संपूर्ण नगर शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी रस्त्यावर कुठेही कचरा दिसता कामा नये. घंटागाडी दररोज व वेळेवर नागरिकांच्या घरोघरी जाणे गरजेचे आहे.
स्वच्छतेबाबत साप्ताहिक नियोजन करावे शहरातील चौक कारंजे महापुरुषांचे पुतळे परिसरात स्वच्छता ठेवण्याचे काम करावे. न्यायालयाच्या निर्देशानुसार प्लास्टिक व चायना मांजा यावरती कारवाई करून जप्त करावे व दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी दिल्या. अहमदनगर महानगरपालिका घनकचरा विभागाची बैठक आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी घेतली यावेळी घनकचरा विभाग प्रमुख डॉ.शंकर शेडाळे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.आयुक्त डॉक्टर पंकज जावळे म्हणाले की शहरातील कचरा संकलन 100% होणे गरजेचे आहे कुठल्याही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये प्लास्टिक कारवाईची मोहीम जोरात सुरू करा मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चायना माझ्या वापर होण्याची शक्यता आहे तरी हा मांजा जप्त करून कारवाई करावी जेणेकरून कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी उपयोजना करावेत शहर स्वच्छतेचे नियोजन करा मनपा स्वच्छता अभियान चे काम आता महापालिकेचे सर्वच कर्मचारी सहभागी होणार आहे त्यानुसार कामाला लागा असे आदेश मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी घनकचरा विभागाला दिल्या.

No comments:

Post a Comment