पुण्यात 11 ते 15 जाने.ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 9, 2022

पुण्यात 11 ते 15 जाने.ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा.

 पुण्यात 11 ते 15 जाने.ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा.

शरद पवार व बाळासाहेब लांडगे आखाड्यातून बाहेर, कुस्तीगीर परिषदेचा राजीनामा, नागपूरच्या खासदाराकडे अध्यक्षपदाची सूत्रे.


पुणे :
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि बाळासाहेब लांडगे अखेर कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडले आहेत. शरद पवार आणि लांडगे यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता कुस्तीगीर परिषदेची सर्व सूत्रे नागपूरचे खासदार रामदास तडस यांच्याकडे आली आहेत. तसेच पुण्यात 11 ते 15 जानेवारी दरम्यान होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा हीच अधिकृत असणार आहे. असे शिक्कामोर्तब काल झालेल्या बैठकीत करण्यात आलं आहे.
क्रीडा क्षेत्रात नवीन कायदा आला आहे. त्यानुसार 80 वर्षावरील व्यक्ती संघटनेच्या पदावर राहू शकत नाही. या नवीन कायद्याची कुस्ती महासंघाने अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच शरद पवार, बाळासाहेब लांडगे, नामदेवराव मोहिते, संभाजी पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात घेण्याची घोषणा केली होती. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली आणि पुण्यातच महाराष्ट्र केसरी स्पर्धा  घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कुणाची? या परिषदेचं नेतृत्व तडस गटाकडे की लांडगे गटाकडे? राज्यात कुस्ती स्पर्धा कुठे होणार? आणि कोण ही स्पर्धा घेणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर त्यावर आज पडदा पडला आहे. काल पुण्यातील बारामती हॉस्टेलला झालेल्या तातडीच्या बैठकीत कुस्तीगीर परिषदेत मोठे निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत शरद पवार आणि बाळासाहेब लांडगे यांनी पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आणि त्याबाबतचंपत्रं भारतीय कुस्ती महासंघालाही देण्यात आलं. काल झालेल्या बैठकीनुसार खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर शरद पवार हे परिषदेचे मुख्य आश्रयदाते राहतील. लांडगे हे उप आश्रयदाते राहणार आहेत. यापूर्वी लांडगे यांच्याकडे परिषदेचं सचिव पद होतं.
परिषदेच्या नव्या कार्यकारिणीत दयानंद भक्त यांच्याकडे सचिवपद देण्यात आलं आहे. अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्याकडे कार्याध्यक्षपद तर अमृता भोसले यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आलं आहे. ही चारही महत्त्वाची पदे असून त्यावरील नियुक्त्या तातडीने करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment