आ.लंकेंच्या समर्थनार्थ जिल्ह्यात विविधी ठिकाणी रास्ता रोको! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 9, 2022

आ.लंकेंच्या समर्थनार्थ जिल्ह्यात विविधी ठिकाणी रास्ता रोको!

 आ.लंकेंच्या समर्थनार्थ जिल्ह्यात विविधी ठिकाणी रास्ता रोको!

आ.निलेश लंके यांनी प्रशासनाच्या विरोधात पुकारलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस!

राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आमदार निलेश लंके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील नाईक चौक येथे भाजप वगळता सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून कार्यकर्त्यांनी पाथर्डी मध्ये जाळपोळ केली. राष्ट्रीय महामार्गाचा कार्यालयातील खुर्च्या कार्यकर्त्यांनी ऑफिसच्या बाहेर आणून त्या पेटवून दिल्या. इतकेच नाही तर शहरातील विविध रस्त्यांवर टायर पेटवून रस्ता बंद करण्याचा देखील प्रयत्न केला. दोन दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने आज मात्र हिंसक वळण घेतले.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर दक्षिण तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा व त्यामुळे रस्ता अपघातात अनेकांचा झालेले मृत्यू व अपंग झालेल्या अनेक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व या तालुक्यातील रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी आमदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केले असतानाही प्रशासकीय पातळीवर आज तिसर्‍या दिवशीही कुठलीही दखल गांभीर्याने  घेतलेली नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील  गावात (सुपा,टाकळी ढोकेश्वर ,अरणगाव, ) येथे कडकडीत बंद पाळत अनेक राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांवर रस्ता रोको आंदोलन उभारण्यात आले असून पाथर्डी शेवगाव राहुरी श्रीगोंदा नगर या सह इतर अनेक तालुक्यात रस्त्यांची झालेली दुर्दशा व या रस्ता आपघातात अनेकांनी गमवलेले प्राण त्याच्या निषेधार्थ पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी आमदार निलेश लंके यांची प्रकृती अल्पशी खालवली असून त्यांचे तिन किलो वजन कमी झाले. यामुळे प्रशासना विरोधात तिव्र स्वरुपात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज नगर पुणे महामार्गावर वाळवणे गावचे सरपंच सचिन आप्पा पठारे यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आमदार लंके यांनी सर्व कार्यकर्त्यांना महात्मा गांधींच्या विचारसरणीवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन केल्यानंतर सचिन पठारे यांनी जिल्हा परिषद सुपा गटातील व पंचक्रोशीतील जनतेच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय कागदोपत्री पाठपुरावा पूर्ण करत हे आंदोलन पार पाडले. सचिन आप्पा पठारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सुपा महामार्गावरील या रास्तारोखो आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख अर्जुन भालेकर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजय औटी सह नगरपंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी माहिती व प्रसारण खात्याचे प्रांताध्यक्ष जितेश सरडे दिपक लंके यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन मेजर भाऊसाहेब भोगाडे सर सतिष भालेकर फिरोज हवालदार सचिन काळे राजेंद्र शिंदे हंग्यांचे सरपंच जगदीश साठे बंडू साबळे बाळू दळवी सतिष दळवी अनिल कर्पे प्रकाश गुंड किशोर थोरत अक्षय थोरात अमोल पवार बाबा नवले भाऊ रासकर सोपान दळवी राजू सोंडकर राजेंद्र लोंढे सह विवीध गावातील सरपंच उपसरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधीकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ या वेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.


कर्तुत्वशून्य स्वयंघोषित पुढार्यांना लोकप्रतिनिधींवर बोलण्याचा अधिकार नाही ! साधी ग्रामपंचायत सदस्य ही नसणारे तालुक्यातील काही स्वयंघोषित व अस्तित्व शून्य पुढारी आमदार निलेश लंके यांच्या कार्यकुशल व विकासात्मक नेतृत्वावर बालिश टीका करतात. व स्वतःचे हसू करून घेतात या पुढार्यांनी गेले अनेक वर्षापासून राजकारणात कार्यरत असतानाही आपआपल्या गावाला अजूनही खेड्याचे स्वरूप आहे हे विसरू नये. त्यांच्या गावातील विकासाचा अनुशेष ही आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातूनच भरून निघत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणाची तरी सुपारी घेऊन पारनेरच्या लोकप्रतिनिधीची बदनामी करण्याचा खटाटोप ही मंडळी करत आहे. - सचिन पठारे, उपसरपंच, वाळवणे.

सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणास बसलेले आमदार निलेश लंके यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज नगर पुणे महामार्गावर शांततेच्या मार्गाने उपोषण करण्यात आले .उपोषणाचा तिसरा दिवस असतानाही प्रशासकीय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले आहे . तर गेले अनेक वर्षात जे स्वतःच्या गावातील विकास करू शकत नाही ते आपली लायकी नसताना तालुक्यातील विकासावर काही स्वयंघोषित पिलावळ ही आमदार निलेश लंके यांच्या वर टीका टिप्पणी करत आहे स्वातंत्र्यानंतर प्रथमच पळवे कडूस रस्त्यासह जिल्हा परिषद सुपा गटातील विविध रस्त्यांचे दर्जेदार काम झाले ते न पाहता आंदोलनाची दिशाभूल करण्यासाठी व लोकप्रतिनिधीला बदनाम करण्यासाठी बालिश बडबड करत आहेत त्यांनी ती थांबवावी .नाहीतर त्यांना जशाच्या तसे उत्तर देण्यात येईल. - भाऊसाहेब भोगाडे सर, सरपंच भोयरे गांगर्डा.

No comments:

Post a Comment