कोल्हार ला गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले पाच सराई आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 9, 2022

कोल्हार ला गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले पाच सराई आरोपी गजाआड.

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

कोल्हार ला गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले पाच सराई आरोपी गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राहता तालुक्यातील कोल्हार येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करता आलेले दुर्गेश बापु शिंदे वय 35, रा. सरस्वती कॉलनी, ता. श्रीरामपूर,  हारुण ऊर्फ राजु रशिद शेख, वय 31, रा. अहिल्यादेवी नगर, ता. श्रीरामपूर, अश्पाक ऊर्फ मुन्ना रफिक पटेल, वय 21, रा. बेलापुर रोड, शहानगर, कोल्हार बुा, ता. राहाता, प्रसन्न विलास लोखंडे, वय 32, रा. गौतमनगर, राजवाडा, कोल्हार बुा, ता. राहाता,  सदानंद राजेंद्र मनतोडे, वय 27, रा. शिबलापुर, ता. संगमनेर यांना पकडुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन गावठी बनावटीचे कट्टे व तीन जिवंत काडतूसे मिळून आले असुन ते जप्त करण्यात आले. आरोपी दुर्गेश बापु शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, पुणे, नाशिक, जालना, सोलापुर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत व आर्म ऍक़्ट प्रमाणे एकुण -17 गुन्हे दाखल आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की, राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी अनिल कटके, स्थागुशा अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, राजवाडा परिसर, गौतमनगर, कोल्हार बुा, ता. राहाता येथे काही इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी येणार आहेत आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिलीप शिंदे, राहुल सोळुंके, रणजीत जाधव, संभाजी कोतकर व भरत बुधवंत अशांनी मिळून मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने राजवाडा परिसर, गौतमनगर, कोल्हार बुा, ता. राहाता येथे जावुन चिंचेच्या झाडा जवळ सापळा लावुन थांबलेले असतांना चार ते पाच इसम एकमेकांशी चर्चा करताना दिसले. बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम असल्याची पथकाची खात्री होताच संशयीतांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना ते पळुन जावु लागले लागलीच पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले
ताब्यातील पाचही इसमांकडे गावठीकट्टे व काडतुस बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईन तपास केला असता त्यांनी सदर गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे विक्री करीता आणल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपींकडे तीन (03) गावठी कट्टे व तीन (03) जिवंत काडतूस असा एकुण 91,500/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर बाबत पोना/37 संदीप विनायक चव्हाण ने. स्थागुशा, अहमदनगर यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील कायदेशिर कार्यवाही लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे दुर्गेश बापु शिंदे यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दोन अजामिनपात्र अटक वॉरंट आहेत. तसेच नमुद आरोपी सदरबाजार पोलीस स्टेशन, जिल्हा जालना यांचेकडील गुन्ह्या मध्ये फरार आहे. आरोपी नामे प्रसन्न विलास लोखंडे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी व लोणी पोलीस स्टेशन येथे खुन व आर्म ऍक़्ट प्रमाणे गंभीर स्वरुपाचे एकुण -02 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व संजय सातव साहेब, उविपोअ शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment