हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, December 8, 2022

हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा.

 हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा.

दोन पीडित मुलींची सुटका.


संगमनेर ः
संगमनेर तालुक्यातील पोखरी येथे हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा टाकून दोन परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली असुन  एका महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. एका महिला आरोपी विरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.406/2022 कलम महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वर परिसरात ील व शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल रात्री ऊूीि संदीप मिटके यांना घारगाव परिसरातील घाटात पोखरी शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली. त्यावरून नाशिक ते पुणे जाणारे हायवे परिसरातील घाटात पोखरी शिवारात बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करण्यात आली. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके, अरुण आव्हाड यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here