जिल्ह्यातील तीन महामार्गाच्या रस्त्या दुरुस्तीसाठी आमदार निलेश लंकेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 8, 2022

जिल्ह्यातील तीन महामार्गाच्या रस्त्या दुरुस्तीसाठी आमदार निलेश लंकेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु.

 जिल्ह्यातील तीन महामार्गाच्या रस्त्या दुरुस्तीसाठी आमदार निलेश लंकेचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु.

पारनेर नगर नेवासा राहुरी पाथर्डीत शेवगावचे तालुक्यातील ग्रामस्थांचे करो‌ या मरो आंदोलन.


पारनेर - 
गेल्या तीन वर्षापासून मनमाड,पाथर्डी व सोलापूर या तीन ही महत्वाच्या राष्ट्रीय मार्गाची गेल्या दोन वर्षापासून झालेली दुरावस्था झाले असून या रस्त्यावर अपघातांचे मोठे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या तीन प्रमुख महामार्गाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी १ वाजल्यापासून सुरू केले आहे.
या आंदोलनात घनश्याम शेलार सभापती नरेंद्र घुले माजी सभापती बाळासाहेब हराळ  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे अॅड श्याम असावा धनराज गाडे राजेंद्र दौड किसन चव्हाण रेणुका ताई पुंड अॅड हरिहर गर्जे शिवशंकर राजळे सतीश पालवे पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी उपनगराध्यक अर्जुन भालेकर योगेश मते डॉ .कावरे आशोक चेडे बाळासाहेब नगरे नितीन अडसुळ श्रीकांत चौरे विजय भा. औटी सुभाष शिदे डॉ .सचिन औटी भुषण शेलार सह सर्व नगरसेवक , बा.ठ.झावरे जितेश सरडे  सतीश भालेकर सरपंच सचिन पठारे सुरेश लगड सचिन साठे संदिप मगर सचिन काळे दादा दळवी किशोर थोरात संतोष तरटे अक्षय थोरात  कारभारी पोटघन बाळासाहेब खिलारी सुधीर लाकुडझोडे भाऊ निवडुंगे संदिप वाघमारे  संदीप शिंदे हर्षल करमकर प्रसाद पवार राजेंद्र दौंड सिताराम बोरुडे रामराव चव्हाण गहिनीनाथ शिरसाट कृष्णा धायतडक अर्जुन धायतडक नंदू मुंडे कृष्णा ढोरकुले अशपाक पठाण तुफैल मतानी संतोष जाधव सिद्धार्थ घोरपडे शेखर बांधले अनिल मोरे कृष्णा सातपुते  गिताराम जगदाळे अमोल उगले आकाश जाधव समर जाधव शहानवाज कुरेशी चद्रकांत चेडे अक्षय चेडे बंडू गायकवाड रमीज राजे भाऊ रासकर वैजयंता मते दिपाली औटी रवींद्र राजदेव यांच्यासह पाथर्डी शेवगाव नेवासा पारनेर नगर मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड,पाथर्डी व सोलापूर या तीन ही महत्वाच्या राष्ट्रीय मार्गाची गेल्या दोन वर्षापासून झालेली दुरावस्था यामुळे या तीन ही महत्वाच्या रस्त्यावर झालेले जीवघेणे अपघात,या रस्त्यावरून सातत्याने वावरणारे नागरीक, शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थी,शेतकरी,नोकरदार वर्ग आदींसह सर्व जनता त्रस्त झाली आहे वारंवार सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तीनही रस्त्याच्या कामा बाबत पाठपुरावा करूनही हे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने बुधवार ७ डिसेंबर पासून सर्वसामान्य जनता व लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना दिले होते.
   अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचे मनमाड,पाथर्डी व सोलापूर या तीनही रस्त्यांच्या कामा बाबत मी स्वतः गेल्या दोन अडीच वर्षापासून काम होण्याबाबत पाठपुरावा करत आहे.संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याची दखल घेतली नाही ही बाब अतिशय खेदजनक आहे.अहमदनगर-पाथर्डी-नांदेड या निर्मल रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले आहे.सदरचा रस्ता शेवगाव,पाथर्डी या मुख्यालयांसह राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र मोहटादेवी,श्री क्षेत्र कानिफनाथ गड,पैठण येथे जाणारा मुख्य रस्ता आहे.या बाबत संबधित विभागाचे अधिकारी गंभीर नसून ते या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत.
मनमाड रस्ता हा राहुरी,संगमनेर,शिर्डी,कोपरगाव,श्रीरामपूर, राहता ही तालुके अहमदनगर शी जोडणारा मुख्य रस्ता आहे.तसेच सोलापूर रस्त्यावरील मिरजगाव, कर्जत, करमाळा, राशीन, टेंभूर्णी असा पुणे- सोलापूर रस्त्यास मिळतो. उत्तर महाराष्ट्रातील, खान्देश, मराठवाड्यातील वारीला जाणारे जाणारे भाविक या रस्त्याच्या पालखी मार्गाने पंढरपूरकडे जात असतात. शिवाय या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूकही सुरू असते. यामुळे होणाऱ्या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.या बाबत आजपर्यंत कोणीही गांभीर्यपूर्वक दखल घेतलेली नाही.या बाबत सर्वसामान्य नागरिक रोज माझ्याशी याबाबत तक्रारी करत आहेत. सामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधी या नात्याने काहीच कार्यवाही करू शकलो नाही याची मला खंत वाटते असेही आमदार निलेश लंके म्हणाले आहे. स्थानिक लोकप्रतिनीधींना हे मग्रूर अधिकारी टोलवा टोलवीची उत्तरे देतात.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करूनही अद्याप काहीच कार्यवाही होत नसल्याने मी निवेदन दिल्यापासून सात दिवसांनी बुधवार.७ डिसेंबरला सामान्य जनतेसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीच्या आमदार लंकेच्या आंदोलनाला आप-मनसे वंचितचा पाठिंबा
कल्याण निर्मल रस्त्याच्या कामासाठी आमदार नीलेश लंके यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाथर्डी तालुक्यातील मनसे आपने पाठिंबा दिला आहे. या मार्गाचे काम व्हावे म्हणून आमच्यासह अनेकांनी कित्येक वेळा आंदोलने केली. मात्र तरीही या मार्गाचे काम झाले नाही. सोमवारपासून या मार्गाचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. त्यामुळे लंके यांनी सुरू केलेल्या आंदोलनात आमच्यासह आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असे मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड‌ व वंचित बहुजन आघाडी यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment