किमान मरणानंतर अमरधाममध्ये होणारी हेळसांड थांबवा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 8, 2022

किमान मरणानंतर अमरधाममध्ये होणारी हेळसांड थांबवा.

 किमान मरणानंतर अमरधाममध्ये होणारी हेळसांड थांबवा.

कोट्यावधीची नवीन स्मशानभूमी नको, अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमींना सुविधा द्या ः संजय कांबळे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः किमान मरणानंतर अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये सुविधा देऊन सर्वसामान्यांची होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. शहरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी असलेल्या जाळ्या जीर्ण होऊन मोडकळीस आल्या आहेत याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी केला आहे.
नालेगाव अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी असलेल्या  जाळ्यांच्या दुरावस्थेमुळे प्रेताची एकप्रकारे विटंबना होत आहे. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसून, सर्वसामान्यांना दु:खद घटनेच्या वेळेस प्रशासनावर संताप व्यक्त करण्याची वेळ येत आहे. अंत्यविधीसाठी असलेल्या ओट्यांवर बसविलेल्या जाळ्या मोडकळीस आलेल्या आहेत. यामुळे अर्ध जळालेले मृतदेह खाली पडण्याची भिती निर्माण झाली आहे. शहरातील नालेगाव हे सर्वात मोठे अमरधाम असून, शहर व उपनगर भागातून अंत्यविधीसाठी मृतदेह आनले जातात. अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड देखील कमी प्रमाणात दिले जात असून, या गैरसोयीमुळे नागरिकांमध्ये चिड व्यक्त होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. नगरकरांना कोट्यावधीची स्मशानभूमी नको, तर जे स्मशानभूमी असतित्वात आहे, त्यांना चांगली सुविधा पुरविण्याची गरज आहे. शहर व उपनगरातील सर्वच स्मशानभूमी, अमरधामची दुरावस्था झालेली आहे. याकडे मनपा प्रशासन लक्ष देत नाही. मात्र अजून एका स्मशानभूमीसाठी कोट्यावधीचा निधी खर्च करण्याची तयारी चालवली आहे. यापेक्षा असतित्वात असलेल्या स्मशानभूमी, अमरधामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment