सावेडी उपनगरासाठी स्मशानभुमीची जागा घेताना महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही अशी कार्यवाही करू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 1, 2022

सावेडी उपनगरासाठी स्मशानभुमीची जागा घेताना महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही अशी कार्यवाही करू.

 सावेडी उपनगरासाठी स्मशानभुमीची जागा घेताना महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही अशी कार्यवाही करू.

सावेडी उपनगरासाठी  स्मशानभुमी आवश्यकच ः महापौर रोहिणी शेंडगे.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सावेडी उपनगरामध्ये स्मशान भूमीसाठी 32 कोटी रुपयांच्या जागेवरून सुरू झालेल्या वादंगाबाबत महापौर रोहिणी शेंडगे यांनी आज भूमिका स्पष्ट केली, असून महासभेत हा विषय आल्यानंतर आज विरोध करणार्‍या सदस्यांनी या विषयावर चर्चा का केली नाही असा प्रश्न उपस्थित करीत सावेडीच्या नागरिकांसाठी स्मशानभुमीसाठी जागा घेताना मनपाचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेवून सावेडी स्मशानभुमी करण्याची कार्यवाही केली जाईल. सावेडीकरांसाठी स्मशानभुमीची आवश्यकता लक्षात घेता हा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिने प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या विषयावर बोलताना महापौर पुढे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या दि. 25 नोव्हेंबर रोजीच्या महासभेमध्ये सावेडी उपनगरासाठी स्मशानभुमीची जागा उपलब्ध करण्याबाबतचा विषय होता. सावेडी उपनगरासाठी स्मशानभुमीची जागा घेण्याबाबत यापूर्वी देखील महासभेमध्ये विषय घेण्यात आला होता. त्यावेळी विरोध करणार्‍या कोणत्याही सदस्याने या विषयावर चर्चा केली नाही. जागा कशी उपलब्ध होईल याबाबत सुचना मांडल्या नाहीत. गेल्या सात आठ वर्षापासून मनपाच्या अंदाजपत्रकीय सभेमध्ये सावेडी स्मशानभुमीसाठी जागा उपलब्धतेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे.  याचा अभ्यास न करता विरोधाला विरोध करायचा म्हणून या विषयाला मोठ्या स्वरूपात विरोध सुरू आहे. सावेडी उपनगरामध्ये लोकवसाहत मोठया प्रमाणात वाढत आहे. तेथील लोकसंख्या अंदाजे दोन लाखाच्या आसपास आहे.  सावेडी उपनगरामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाळयामध्ये अंत्यविधीसाठी शहरात येताना मोठया प्रमाणात समस्या निर्माण होतात. रात्रीच्या वेळी अंत्यविधी करण्यासाठी शहरात जावे लागत असल्याने त्यावेळी वाहने उपलब्ध होत नाहीत. अंत्यविधी झाल्यापासून दशक्रीया विधीपर्यत अमरधाम मध्ये विधी करण्यासाठी यावे लागते. सावेडी भागात स्मशानभूमी व्हावी ही उपनगरवासियांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. कोवीड काळात नालेगांव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलबध होत नव्हती. प्रेत जाळण्यासाठी देखील नंबर लागले होते अशी भयानक परिस्थिती इतर ठिकाणी स्मशानभुमी नसल्यामुळे आली होती. या अमरधाम मध्ये अंत्यविधी करताना आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास झाला.  आता या विषयाला विरोध करणारे अनेक वर्षापासूनच्या मागणीचा व सावेडीकरांना अंत्यविधीसाठी होणा-या त्रासाचा विचार केलेला दिसून येत नाही.  अहमदनगर महानगरपालिकेस सावेडी स्मशानभुमीसाठी जागा दाखविली आहे का किंवा जागा उपलब्ध होण्यासाठी कोणते प्रयत्न केले हाही महत्वाचा विषय आहे. स्मशानभुमीसाठी आरक्षणाची जागा आहे अशी बोंबाबोब करणा-यांनी इतकी वर्ष गप्प का बसले.

महासभेमध्ये सावेडी स्मशानभुमीसाठी जागेबाबत ब-याच वेळा चर्चा झाली. त्यावेळी हया सदस्यांनी आरक्षणाची जागा घेण्याबाबत का सुचना मांडल्या नाहीत. आजच त्यांना आरक्षणाच्या जागेची माहिती झाली का मग ही जागा मनपाने ताब्यात घ्यावी असे कोणते प्रयत्न यांनी केले ते  त्यांनी सांगावे. ज्यांच्या जागेवर आरक्षण पडले त्यांनी जागा देण्यास नकार दिला किंवा काय याची शहानिशा न करताच प्रसिध्दी मिळविण्यासाठी कोणतेही आरोप करित आहेत. वास्तविक पाहता याला विरोध करणा-या सदस्यांनी सभागृहामध्ये थांबून आपले विचार मांडले पाहिजे. याविषयावर चर्चा करायला पाहिजे होती. स्मशानभुमीसाठी सावेडी भागामध्ये असलेल्या जागेची माहिती देणे क्रमप्राप्त होत.  विषयावर चर्चा करण्यासाठी सभागृहात न थांबता प्रसिध्दीसाठी वर्तमानपत्रामध्ये उलट सुलट बातम्या देवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करित आहे. असे ही त्या म्हणाल्या.


 

No comments:

Post a Comment