सेनापती बापटांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा ः हजारे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 30, 2022

सेनापती बापटांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा ः हजारे.

 सेनापती बापटांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा ः हजारे.

पुण्यतिथीनिमित्त सेनापती बापटांना अभिवादन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः
 सेनापती बापटांचे कार्य दिशादर्शक असून त्यांचे पारनेर शहरातील जन्मस्थळा ला  राष्टीय स्मारकाचा दर्जा मिळण्याची मागणी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी केली आहे.
 सेनापती बापट यांच्या पुण्यतिथीनिमित्त जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथील त्याच्या जन्मस्थळ मधील  स्मारकात जाऊन त्यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी ते बोलत होते त्यांच्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाठारे,पंचायत समिती सदस्य श्रीकांत पाठारे,दत्ता शेरकर व श्याम पठाडे  उपस्थित होते
यावेळी अण्णा हजारे म्हणाले कि सेनापती  बापट यांचे कार्य  पाहिल्यानंतर एक ऊर्जा मिळते आपल्या तालुक्यात या महान व्यक्तीचा जन्म झाल्याने अभिमान वाटत  असून  त्यांच्या या स्मारकाला राष्टीय स्मारकाचा दर्जा मिळावा  व त्यांच्या  कार्यावर एखादा जीवनपट तयार करावा  तो या स्मारकात येणार्‍या पर्यटक व नागरिकांना दाखवण्यात यावा जेणेकरून बापट यांच्या कार्यातून आगामी पिढीला  प्रेरणा मिळेल.

No comments:

Post a Comment