दिशा सालियान प्रकरणात पुरावे असतील तर ‘एसआयटी’मार्फत चौकशी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 22, 2022

दिशा सालियान प्रकरणात पुरावे असतील तर ‘एसआयटी’मार्फत चौकशी.

 दिशा सालियान प्रकरणात पुरावे असतील तर ‘एसआयटी’मार्फत चौकशी.

दिशा सालियान प्रकरणाची चौकशी करा, शिंदे गटाने उकरला मुद्दा, आदित्य ठाकरेंसह विरोधकांचा गोंधळ.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा.


नागपूर :
दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या पुन्हा एकदा उकरण्यात आला आहे. शिंदे गटाने दिशा सालियान प्रकरणाच्या चौकशीबाबत मुद्दा उपस्थितीत केला. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या उपस्थितीत केला आणि अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने अधिवेशनातही मुद्दा मांडला. आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. दिशा प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. जे काही पुरावे आहे, ते त्यांनी द्यावे या प्रकरणाची डखढ मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
दिशा सालियान प्रकरणाबाबत भाजपचे आमदार नितेश राणेंनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नव्हता असा दावा केला आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे नव्हता, तो तपास मुंबई पोलिसांकडे होता, असा खुलासा केला. दिशा प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे गेला नव्हता, तो तपास हा मुंबई पोलिसांकडेच होता. असे सांगत फडणवीस पुढे म्हणाले की, सीबीआयकडे सुशांतच्या प्रकरणाचा तपास होता.यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही. कुणालाही टार्गेट करण्याचा हेतू नाही, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
दिशाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यामुळे आम्ही चौकशीची मागणी केली आहे. राहुल शेवाळे यांना काय विचारायचे आहे ते दिल्लीला जाऊन विचारू पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, असं नितेश राणे म्हणाले. तर, दिशाला न्याय मिळाला पाहिजे, आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. असं आमदार नितेश राणे म्हणाले.
तीन वेळा सभागृहाचे कामकाज थांबवले आहे, आणखी कितीही वेळा बंद करावे लागले तरी करू, असं भरत गोगावले म्हणाले. तर, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा फक्त भाजप चा आहे का इतर पक्ष का सोबत येत नाही. विरोधक चौकशीला का घाबरत आहे, मुलीवर अन्याय होत असेल तर विरोधकांनी सोबत यायला पाहिजे. दिशा सालियान च्या मृत्यू तपासाची पूनर्मागणी आम्ही सभेत केली. असं गोगावले म्हणाले. दिशा सालियानचा मृत्यू कशामुळे झाला, तिने आत्महत्या केली की तिला इमारतीवरून खाली फेकले आहे का? दिशा आणि सुशांत यांच्यामध्ये फोनवर संवाद झाला आहे का? याची तपशील उघड झाली नाही. दिशाने काही तरी माहिती पोहोचवली, त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी सीबीआयने अद्याप कोणताही रिपोर्ट दिला नाही. यात काही तरी तथ्य आहे, दिशाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अजून समोर आला नाही. तिच्या सोबत त्यावेळी कोणकोण होतं, याची माहिती समोर आली नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गोगावले यांनी केली. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आधीच्या सरकारच्या तपासावर विश्वास नाही. लोकांच्या समोर अण कोण आहे.हे यायला पाहिजे. लोकांना संशय आहे, हा खून आहे. त्यामुळे या प्रकारांची चौकशी व्हायला पाहिजे. मोठी लोक असेल म्हणून अशे प्रकरण समोर यायचे नाही असं आहे का? असं माधुरी मिसाळ म्हणाल्या. दिशाचा मृत्यू इमारतीवरून पडून - उइख चा निष्कर्ष विशेष म्हणजे, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणाचा तपास करून सीबीआय एका निष्कर्षावर पोहोचली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आला. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्याने छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला असं सीबीआय तपासात समोर आलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयने हा निष्कर्ष काढला होता.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा ः नितेश राणेंनी केली मागणी


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित करत भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ’जेव्हा जेव्हा सुशांत आणि दिशा सालियनच्या मृत्यूची बातमी येते तेव्हा त्यात आदित्य ठाकरेंचे नाव का येते? सुशांतचे चाहतेही अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे आदित्यची नार्को टेस्ट झाली पाहिजे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा उघड करून त्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. 8 आणि 9 जूनच्या मध्यरात्री घडलेल्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असे राणे म्हणाले. दिशा सालियन या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी दोनदा का बदलले? याचाही खुलासा व्हायला हवा. आजपर्यंत, दिशा सालियनचा (दिशा सालियन पोस्ट मॉर्टेम) अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलेला नाही. या सर्व गोष्टी का लपवल्या जात आहेत? असेही राणे म्हणाले.

No comments:

Post a Comment