देवेंद्र फडणवीस पुण्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 23, 2022

देवेंद्र फडणवीस पुण्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.

 राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.

देवेंद्र फडणवीस पुण्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना.


मुंबई ः
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीस अचानक हे पुण्याहून दिल्ली दौर्‍यावर जाणार असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. भाजपच्या आमदार आमदार मुक्ता टिळक यांचे गुरुवारी (22 डिसेंबर) निधन झाले होते. मुक्ता टिळक यांच्या पार्थवाला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर फडणवीस हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुक्ता टिळक यांच्यावर पुण्यात आज (23 डिसेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. फडणवीसांच्या अचानक दिल्ली दौर्‍यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा ठराव कर्नाटकच्या हिवाळी अधिवेसनात कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ठराव मांडला होता. आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव त्यांच्या अधिवेशनात गुरुवारी (23 डिसेंबर) एकमताने मंजूर झालेला आहे. दरम्यान, कर्नाटकाकडे कोणी जर वाकड्या नजरेने पाहिले तर आम्ही कोणत्याही गोष्टीची पर्वा करणार नाही, असा इशाराही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

No comments:

Post a Comment