4 हजाराची लाच मागणारी महिला अँटी करप्शन ब्युरोच्या ट्रॅपमध्ये अडकली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 22, 2022

4 हजाराची लाच मागणारी महिला अँटी करप्शन ब्युरोच्या ट्रॅपमध्ये अडकली.

 4 हजाराची लाच मागणारी महिला अँटी करप्शन ब्युरोच्या ट्रॅपमध्ये अडकली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः व्यावसायिक जीएसटी रिर्टनचा नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी चार हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या सारीका निकम या जीएसटी अधिकार्‍याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील तक्रारदाराने लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारदाराचा व्यवसायिक जीएसटी नंबर रिर्टन न भरल्याने जुलै 2022 मध्ये रद्द करण्यात आला होता. तो जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज दिला. त्यासाठी जीएसटी अधिकारी निकम यांनी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
17 ऑक्टोबर 2022 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपीने जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी चार हजारांच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. 21) गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शरद गोर्डे, पोलिस नाईक चौधरी, कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, राधा खेमनर, संध्या म्हस्के, तागड यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment