संभाजीनगर परीसरात पाणी पुरवठा सुरळीत, नविन विद्युत पंप कार्यान्वित. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

संभाजीनगर परीसरात पाणी पुरवठा सुरळीत, नविन विद्युत पंप कार्यान्वित.

 संभाजीनगर परीसरात पाणी पुरवठा सुरळीत, नविन विद्युत पंप कार्यान्वित

कर्तव्यदक्ष पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांची तत्परता.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने पारनेर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे हंगा जलाशय पुर्ण क्षमतेने  भरुन गेले आहे. पण मागील काही महिन्यात शहरात पाणी पुरवठा  करण्यात काही तांत्रिक अडचण आल्याने शहराला वितरित करण्यात येणारा पिण्याचा पाण्याचा  पुरवठा नियमीत झाला नव्हता. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या विद्युत पंप नादुरुस्त असल्याने पाणी पुरवठा करण्यास विलंब लागल्याचा सविस्तर खुलासा सोशल मीडियावर नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी केला होता. सविस्तर खुलासा करताना त्यांनी शहरातील नागरीकांना विद्युत पंप येत्या चार पाच दिवसात कार्यान्वित केला जाईल असा शब्द दिला होता. दिलेला शब्द कर्तव्यदक्ष पाणी पुरवठा सभापती योगेश मते यांनी खरा करून दाखविला. तीन दिवसातच नगराध्यक्ष व ठेकेदार यांच्या सहकार्याने नविन विद्युत पंप कार्यान्वित केला.
सविस्तर माहिती अशी की, पारनेर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हंगा जलाशयातून केला जातो. शहरातील कॉलेज जवळील पाणी साठवण टाकीत साठवले जाते. तसेच डॉ. सय्यद यांचा घरामागील टाकीत पण सोडले जाते. त्या नंतर तेथून नळद्वारे वितरण केले जाते. संभाजीनगर, राहुलनगर, लोणी रोड, जामगाव रोड, या परीसरात नळा द्वारे वितरित केले जाते. सुरवातीला काही दिवसापासून एकाच विद्युत पंपावर शहरातील पुरवठा चालु होता. त्या मुळे हा पंप वारंवार नादुरूस्त होत होता. तो पंप दुरुस्त होई पर्यंत आठ दहा दिवस विलंब लागत असायचा त्या मुळे शहराला पिण्याच्या पाण्या पासून वंचित राहावे लागत असे. नागरिकांच्या मुलभूत सुविधाचा प्रश्न दैनिक वर्तमान पत्रातून व सोशल मीडियावर सडेतोड मांडल्याने नगर पंचायत व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,पाणी पुरवठा सभापती, नगरसेवक यांनी तातडीने विद्युत पंप कार्यान्वित करून शहरातील पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरळीत केला. व कर्तव्यदक्ष सभापती योगेश मते यांनी सोशल मीडिया द्वारे नविन विद्युत पंप कार्यान्वित केला जाईल असा शब्द दिला होता. की चार पाच दिवसात नवीन पंप कार्यान्वित केला जाईल त्या प्रमाणे पाणी पुरवठा करणार्‍या विहरीवर नवीन विद्युत पंप बसविला व कार्यान्वित केला. पुरवठा करणारा पंप वारंवार नादुरूस्त होत होता. पण आता स्टँड बाय एक नवीन विद्युत पंप उपलब्ध केला आहे. व पाणी पुरवठा नियमीत सुरू झाल्याने  पारनेर शहरातील नागरीक नगर पंचायतचे आभार मानत आहेत.

No comments:

Post a Comment