गावगाड्याचा कारभार महिलांच्या हाती.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

गावगाड्याचा कारभार महिलांच्या हाती..

 गावगाड्याचा कारभार महिलांच्या हाती..

नगर तालुक्यातील 19 गावांमध्ये महिला सरपंच तर 8गावात महिला उपसरपंच.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यात नुकत्याच 27 ग्राम पंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. 27 पैकी 19 गावांच्या सरपंचपदाचा मान महिलांना मिळाला तर आठ गावांमध्ये उपसरपंचपदी महिला विराजमान झाल्या आहेत. स्वः गटाबरोबरच विरोधी गटाच्या सदस्यांना विश्वासात घेऊन गावाच्या विकासाची जबाबदारी या महिला सरपंच उपसरपंचांना पेलावी लागणार आहे.
राजकीय आरक्षणा मुळे महिलांना राजकारणात अनेक मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे. मिळालेल्या राजकीय आरक्षणाचा लाभ घेत गावच्या विकास कामात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने अथवा त्यापेक्षाही अधिक योगदान दिल्याचे आपण पाहिले आहे. काही गावांमध्ये महिला आरक्षणाने प्रस्थापितांना धक्का बसला असला तरी त्यांनी आपल्या सौभाग्यवतींना राजकारणात पुढे करत विकास कामांची गंगा पुढे नेण्याचे काम केले आहे. राजकारणात नव्याने आलेल्या महिला देखील प्रशासन व विरोधी गटाला विकास कामांच्या बाबतीत हातळताना आपली कुशलता दाखविण्या बरोबरच आपणही कशातही कमी नसल्याचे दाखवून देत आहेत.
नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीपैकी 19 ग्रामपंचायतीत सरपंच तर 8 गावात उपसरपंच महिला कारभारी बनल्या आहेत. या महिलांवर गावच्या विकास कामाची मोठी जबाबदारी आली आहे. गावामध्ये विकास कामाची गंगा वाहताना त्या आपल्यातील असलेले राजकीय कौशल्य पणाला लावतील आणि आपणही कमी नसल्याचे दाखवून देतील.

साकत मधील जनतेने जनतेनी मोठ्या विश्वासाने मला विकास करण्याची संधी दिली आहे. गावाच्या विकासासाठी मी कटीबद्ध राहणार असून नियमित स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे, रस्त्यांची कामे करणे. याबरोबरच  गावातील विविध विकास कामांना प्रधान्य देणार आहे. - मीना बाबासाहेब चितळकर, उपसरपंच, साकत खुर्द

या गावांत आहेत महिला सरपंच
वडगाव तांदळी : इंदूबाई रावसाहेब रणसिंग
राळेगण म्हस्कोबा : दिपाली सुधीर भापकर
दहिगाव : सुरेखा मधुकर म्हस्के
सारोळा बद्दी : गयाबाई शंकर डहाणे
आठवड : सविता सुनिल लगड
बाबुर्डी बेंद : मंदा सुनिल खेंगट
रांजणी :
लहानुबाई अरुण ठोंबे
कापूरवाडी : जनाबाई साहेबराव दुसुंगे
कौडगाव जांब : सविता रावसाहेब खर्से
पिंपळगाव लांडगा : अनिता दिनकर लांडगे
नारायण डोहो : श्रद्धा बाळासाहेब साठे
शेंडी : प्रयागा प्रकाश लोंढे
सारोळा कासार : आरती रविंद्र कडूस
उक्कडगाव : हेमलता नवनाथ म्हस्के
पिंपळगाव कौडा : प्रतिभा बाळासाहेब शिंदे
नेप्ती : सविता संजय जपकर
आगडगाव : आशाबाई परमेश्वर पालवे
खातगाव टाकळी : रुथा छगन वैराळ
टाकळी खातगाव : सुनिता राजु नरवडे

या गावात महिला उपसरपंच

पिंपळगाव कौडा - संगीता पवार
कापूरवाडी - मनिषा भगत,
पांगरमल - कविता आव्हाड,
शेंडी - सरिता कराळे,
सारोळा कासार - शुंभागी काळे,
साकत - मिनाबाई चितळकर,
कौडगाव जांब - नम्रता काळे,
जखणगाव - साबिया शेख

No comments:

Post a Comment