चापडगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 20, 2022

चापडगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई.

 चापडगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई.

श्रीरामपूर ः शेवगाव तालुक्यातील चापडगाव जवळच असणार्‍या गदेवाडी रोडवर एका शेता मधील जुगार अड्ड्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील कर्मचार्‍यांसह छापा टाकून नऊ लोकांना जुगार खेळताना पकडले आहे. या जुगार खेळणार्‍या लोकांकडून सुमारे चार लाख 66 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कुंदन संभाजी मडके (वय 30 वर्ष रा सोनई सांगवी ता शेवगाव), बाबासाहेब एकनाथ मस्के (रा. आखातवाडा ता. पैठण जि.औरंगाबाद) भगवान अर्जुन झिरपे (वय 47 वर्षे रा. कोळगाव ता.शेवगाव) रामकिसन नारायण कोलाळे (वय 50 वर्ष रा. गदेवाडी ता.शेवगाव) भगवान बापूराव झिरपे (वय 47 रा. कोळगाव ता. शेवगाव) भगवान विष्णू ढाकणे (वय 43 वर्ष रा. हसनापूर तालुका शेवगाव) बाप्पासाहेब त्र्यंबक विघ्ने (वय 40 वर्ष रा. कोर्टाच्यामागे शेवगाव) काकासाहेब भाऊसाहेब घोरतळे (रा बोधेगाव ता शेवगाव) विनोद दत्तात्रेय नेमाने (वय 30 वर्ष रा. चापडगाव ता शेवगाव.) या  सर्व आरोपी विरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे पो.कॉ.नितीन चव्हाण यांच्या फिर्यादिवरून मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली दादाभाई मगरे, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, नितीन चव्हाण, नितीन शिरसाठ आदींनी केली.

No comments:

Post a Comment