...अन्यथा तेली समाज रस्त्यावर उतरेल ः हरिभाऊ डोळसे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 16, 2022

...अन्यथा तेली समाज रस्त्यावर उतरेल ः हरिभाऊ डोळसे.

 ...अन्यथा तेली समाज रस्त्यावर उतरेल ः हरिभाऊ डोळसे.

मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्या “कहा गंगू तेली” वक्तव्यावरून तेली समाजातर्फे जाहिर निषेध.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या नाशिक  विभागाच्या वतिने मनसेे नेते बाळा नांदगांवकर ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे यांच्याविषयी टिका करताना असे बोलले कि,कहा राजा भोज कहा गंगु तेली असे बोलुन आमच्या तेली जातीचा अपमान मानहाणी करण्याचे काहिच कारण नसताना जाती वाचक शब्दाचा प्रयोग करून स्वतःच्या राजकारणाच्या फायद्या करीता इतर जातीचा आपल्या भाषणात चांगला उपयोग करून बोलुन तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक महासभेचे विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले.  
जिल्हाधिकारी कार्यालय येथे मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा निषेध करून नायब तहसीलदार किरण देवतरसे यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे पोपटराव शेजवळ, दत्तात्रय कर्पे, गोरक्षनाथ व्यवहारे,परसराम सैंदर, सचिन म्हस्के,उमाकांत डोळसे,चेतन डोळसे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात डोळसे यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या म्हणी वापरू नये.याबाबत शासकीय पत्र काढून प्रशासनास योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत.जेणेकरून अशा वादग्रस्त म्हणींमूळे वारंवार उद्भवणारे वाद भविष्यात होणार नाहीत.आमची तेली जात हि संपुर्ण जगात सर्व प्रथम तयार झाली आहे.मानव प्राण्याची निर्मिती  झाली असता.प्रथम अन्न खाण्याचा शोध व अनेक खाद्य पदार्थ चा प्रयोग सुरु असताना प्रथम तिळाच शोध लागला असता.तिळाला दगडा वर रगडुन त्या मधुन तेल बाहेर पडु लागले.ते तेल खाण्यासाठी प्रयोग करून हा प्रयोग प्रथम यशस्वी झाला.असता तिथुन पुढे तेल तयार करणारा मानव प्राणी हा तेली समाज म्हणुन ओळखु लागला.तर आज पर्यत तेल काढुन  देणारा हा मानव प्राणी तेली जाती मध्ये रूंपातर झाला.असा सुंदर चांगला इतिहास आमच्या तेली समाजाला आहे.तसेच राष्ट्रसंत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म तेली समाजाच्या कुळात झाला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंग व गाथा त्याकाळच्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी इंद्रायणी नदीत अभंग व गाथा बुडविलेल्या होत्या.जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग व गाथा या राष्ट्रसंत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांनी तंतोतंत लेखन करून या अभंग व गाथांचा अमृतरुपी ठेवा सर्व समाजासाठी जतन करून ठेवला आहे.या अभंग व गाथा आध्यात्मिक दृष्ट्या हिंदू धर्मासाठी महत्त्वाचे कार्य करीत आहे. वारकरी संप्रदायाचा थोर वारसा समस्त तेली समाजाला लाभला आहे.राष्ट्रसंत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या शिकवणीप्रमाणे समस्त तेली समाजाची वाटचाल वारकरी संप्रदायाप्रमाणे,सुसंस्कृत व शिस्तबद्धपणे सुरू आहे. असेही डोळसे म्हणाले.
जगाच्या कल्याणासाठी आमचा तेली समाज सतत कष्ट करून जिंद्दीने प्रमाणीकपणे काम करीत आहे.आमच्या समस्त तेली जातीचा अपमान करुन आमच्या भावणांना ठेंच पोहोचवली आहे. आम्ही तेली समाज बांधव मनसे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांचा जाहीर पणे निषेध करतो.या पुढे सर्व  राजकारणातील पुढारी यांनी कोणत्याही विषयाच्या उदाहरणा करीता म्हणी वापरुन आमच्या तेली जातीचा उपयोग  करू नये.अन्यथा तेली समाज रस्त्यावर उतरेल व धडा शिकवेल. असा इशारा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी दिला.

No comments:

Post a Comment