तरुणाची मोटर सायकलसह जाळून घेऊन आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 16, 2022

तरुणाची मोटर सायकलसह जाळून घेऊन आत्महत्या.

 तरुणाची मोटर सायकलसह जाळून घेऊन आत्महत्या.


श्रीरामपूर ः
श्रीरामपूर शहरातील वार्ड नं. 2, वैदूवाड्यामध्ये राहणार्‍या 24 वर्षीय विशाल रामा शिंदे या तरूणाने काल पहाटे आपल्या मोटारसायकलसह स्वतःला जाळून घेतले. काल दुपारी लोणी येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, विशाल शिंदे हा मध्यमवर्गीय कुटूंबातील तरूण असून तो नगरला नोकरीला होता. परवा रात्री लोणी येथून एका कंदूरीच्या कार्यक्रमाला विशाल हा जाऊन आला होता. त्यानंतर तो घरी येवून झोपला. नेहमीप्रमाणे तो पहाटे उठला. पहाटे तो जिमला जात असत. त्यामुळे घरच्यांनाही तो गाडी घेवून जिमला गेला, असे वाटले. परंतु, थोड्यावेळाने त्याच्या वडीलांना आणि नातेवाईकाला विशालने मोबाईलवर कॉल केला व कॉलेजच्या पाठीमागे चिंचेच्या बागेत माझी गाडी आणि मी जळत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे नातेवाईक आणि वडीलांना धक्का बसला. त्याठिकाणी तातडीने नातेवाईक धावले. त्यांनी जळत असलेल्या विशालला विझवले आणि तातडीने रूग्णालयात नेले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असताना दुपारी 3 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. काल संध्याकाळी विशाल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.विशाल शिंदे या 24 वर्षीय तरूणाने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समोर आले नाही. विशेष म्हणजे कालच त्याची दुसर्‍या ठिकाणी नोकरीसाठी जॉयनिंग होती. परंतु, जॉयनिंगपूर्वीच पहाटे विशाल याने आत्महत्या केली. आदल्या दिवशी तो लोणीला कंदूरीला गेला होता. त्यामुळे विशाल याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली? याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नाही. परंतु, या आत्महत्येची परिसरात जोरदार चर्चा आहे.

No comments:

Post a Comment