गोवानिर्मित व्हिस्कीचा साठा जप्त; 1 आरोपी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 21, 2022

गोवानिर्मित व्हिस्कीचा साठा जप्त; 1 आरोपी गजाआड.

 राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर विभागाची कारवाई.

गोवानिर्मित व्हिस्कीचा साठा जप्त; 1 आरोपी गजाआड.


नुकत्याच जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांच्या अनुषंगाने अवैध मद्यावर या विभागाने दि.1 डिसेंबर 2022 ते दि. 20 डिसेंबर या कालावधीत एकुण :- 117 गुन्हे नोंदकरुन 101 आरोपींना अटक करण्यात आली आहेत. सदर कारवाईत देशीमद्य:- 528.64 ब.लि., विदेशी मद्य:- 1027 ब. लि., बिअर :- 214.98 ब.लि. हातभट्टी दारु :- 1027 ब.लि., रसायन: - 24740 ब.लि., ताडी:- 545 ब.लि., परराज्यातील मद्य:- 216 ब. लि., जप्त वाहने - 11 असा एकूण- 28,83,275/- इतक्या रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जामखेड करमाळा रोडवर गोवा राज्यात तयार झालेल्या 25 बॉक्स, 180 मिलीच्या इम्पीरियल ब्ल्यू व्हिस्की च्या सीलबंद बाटल्या व चार चाकी लाल रंगाची महिंद्रा स्कॉर्पियो सह 6 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर विभागाकडून जप्त करण्यात आला असून बेकायदेशीर रित्या व राज्यातील विदेशी मद्याचा साठा जप्त करून वाहतूक करणार्‍या आप्पासाहेब महादेव कुमटकर रा. राजेवाडी ता.जामखेड यास अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता असून सदर गुन्हयाचा पुढील तापस सुरु आहे. सदर प्ररकणाचा पुढील तपास जी. टी. खोडे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब-विभाग, जि. अहमदनगर हे करीत आहेत.
ही कारवाई  विजय सुर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, सुनिल चव्हाण, मा.संचालक, (अंबलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क, मुंबई, अनिल चासकर, विभागीय उप आयुक्त, पुणे विभाग, पुणे व गणेश द पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यांत आली आहे.
या कारवाईत जी. टी. खोडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग,  डि. आर. ठोकळ, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब-1, आर. पी. दांगट, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, व-2 अहमदनगर, टी. बी. करंजुले, सहा. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पी. डी. गदादे, जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क, ब- विभाग  ए. ए. कांबळे, जवान, राज्य उत्पादन शुल्क, ब-1 विभाग, डी. ए. खैरे, जवान राज्य उत्पादन शुल्क, ब-विभाग, एस.ए. पवार, जवान, राज्य उत्पादन शुल्क, ब- विभाग, सुनंदा अकोलकर महिला जवान, राज्य उत्पादन शुल्क, व विभाग, अहमदनगर हे सदर कारवाई मध्ये सहभागी होते.
यापुढेही नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैद्य मद्य, हातभट्टी दारू, ताडी इत्यादी निर्मिती व विक्रीवर कारवाईसाठी नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपल्या परिसरात अवैद्य मद्यविक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागास तात्काळ देण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर विभागाचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment