‘मयूर’ मावा सेंटरवर तोफखाना पोलिसांचा छापा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 21, 2022

‘मयूर’ मावा सेंटरवर तोफखाना पोलिसांचा छापा.

 ‘मयूर’ मावा सेंटरवर तोफखाना पोलिसांचा छापा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकातील प्रसिद्ध अशा ‘मयूर‘ मावा सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून मावा तयार करणारे मशीन व कच्चा तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत.
या मावा सेंटरवर खुले आम तंबाखूजन्य माव्याची विक्री होत होती. तरुणांना कर्क रोगाचे आमंत्रण देणार्‍या या गुटख्यामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद होत आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे हा मावा बनवण्याचा कारखाना पाईपलाईन हडको मधील एका घरामध्ये सुरू होता. अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मावा बनवण्याचे काम सुरू होते.

No comments:

Post a Comment