स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुळा धरणात मारल्या उड्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 21, 2022

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुळा धरणात मारल्या उड्या.

 स्वाभिमानीचं जलसमाधी आंदोलन.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुळा धरणात मारल्या उड्या.

जलसमाधीसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्‍यांना मदत न मिळालेच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आज जाहीर केलेल्या जलसमाधी आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवून मुळा धरणात उड्या मारल्या पण पोलीस प्रशासनाने त्यांना रेस्क्यू टीमच्या माध्यमातून पाण्यातून बाहे काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार होतं. पण त्यापुर्वीच पोलिसांनी रविंद्र मोरे यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना  ताब्यात घेतलं आहे.
आज अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना मदत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीनं मदत देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. आपल्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज पुकारण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिला. ठाकरे गटाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी मुळा धरणाच्या गेटवर पोहोचले. मात्र या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याने पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच आडवले. पोलिसांनी आंदोलकांना गेटवर आडवल्यानं आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनस्थळी पोलीस, रेस्क्यूरीटीम, फायर फायटरचे जवान आणि आरोग्य पथकही तैनात करण्यात आले होते. दरम्यान या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यानं हे आंदोलन चर्चेचा विषय बनलं आहे. शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावरूनच राजू शेट्टी हे ठाकरे सरकारमधून बाहेर पडले होते. मात्र आता शिवसेना ठाकरे गटानेच या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण अद्यापही शेतकर्‍यांना मदत मिळाली आहे. राज्य सरकारकडून ही मदत मिळण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीनं वारंवार मागणी करण्यात आली. अनेकदा निवदेने दिली, आंदोलनेही केली. पण राज्य सरकारने स्वाभिमानीच्या निवेदनाची, आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे 20 डिसेंबर पर्यंत सरकारने मदत दिली नाही तर 21 डिसेंबरला मुळा धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला होता. जलसमाधीसाठी काही कार्यकर्ते मुळा धरणाजवळ पोहचले. पण पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं आहे.

No comments:

Post a Comment