हॉटेलमधील वादातून युवकाची हत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

हॉटेलमधील वादातून युवकाची हत्या.

 दोन आरोपींवर गुन्हा दाखल. आरोपी फरार.

हॉटेलमधील वादातून युवकाची हत्या.


अहमदनगर -
15 डिसेंबर 2022 रोजी विजय भगवान कुर्‍हाडे (वय 22 रा.गांधीनगर बोल्हेगाव) या युवकाच्या हत्याप्रकरणी दादा उर्फ प्रतीक चंद्रकांत कांबळे (रा.नागापूर) व भागेश उर्फ गोट्या मधुकर नाकाडे (रा.आदर्श नगर बोल्हेगाव फाटा) या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय सोबत कांबळे व नाकाडे यांचे वाद झाल्यानंतर त्याला त्यांनी मारहाण केली. ते मारहाण केलेल्या दिवसांपासून गायब असून ते दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहितीही पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
विजय कुर्हाडे हा युवक बेपत्ता झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान बेपत्ता विजयचा मृतदेह 15 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी नागापूर परिसरातील काकासाहेब म्हस्के रोडवर आढळून आला होता. विजय कुर्‍हाडे यांचा मृत्यू लाथाबुक्क्यांनी व हत्याराने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाचा डॉक्टरांचा प्राथमिक अहवाल एमआयडीसी पोलिसांना प्राप्त झाला आहे.
याची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केला होता. दरम्यान विजयच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली होती. पुणे येथील ससून रूग्णालयात त्याचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्याची मागणी त्यांनी केली होती. पोलिसांनी त्यांची मागणी मान्य करीत विजयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथील ससून रूग्णालयात केले होते. शवविच्छेदननंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवला होता. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.
दरम्यान ससून रूग्णालयाकडून डॉक्टरांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात विजयचा मृत्यू लाथाबुक्क्यांनी व हत्याराने मारहाण केल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मयत विजय कुर्हाडेचा भाऊ गोरख भगवान कुर्हाडे (वय 32, मुळ रा. गोंधळे गल्ली, वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.


No comments:

Post a Comment