सारोळा कासारच्या उपसरपंचपदी शुभांगी काळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 30, 2022

सारोळा कासारच्या उपसरपंचपदी शुभांगी काळे.

 सारोळा कासारच्या उपसरपंचपदी शुभांगी काळे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  नगर तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्या सारोळा कासार ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शुभांगी विठ्ठल काळे यांची गुरुवारी (दि.29) दुपारी बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच आरती रवींद्र कडूस यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
सारोळा कासार  ग्रामपंचायतीची निवडणूक दि.18 डिसेंबरला  झाली होती. या निवडणुकीत माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस यांच्या नेतृत्वाखालील ग्रामसुधार पॅनेलने 11 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. विरोधी लोकशाही विकास आघाडीला 4 जागा मिळाल्या होत्या. आरती कडूस या दुसर्‍यांदा जनतेतून सरपंच झाल्या आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच बैठक गुरुवारी (दि.29) दुपारी पार पडली. या विशेष सभेत उपसरपंचपदासाठी सौ.शुभांगी काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून तुकाराम ढोरे यांनी स्वाक्षरी केली होती. या निवडीसाठी निवडणुक निरीक्षक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शरीफ शेख उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्य रविंद्र कडूस, दत्तात्रय कडूस, तुकाराम ढोरे, सुजाता नगरे, योगिता लिभोरे, आशाबाई कडूस, अनिरुद्ध धामणे, रोहित काळे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी मिना जाधव, लिपिक असिफ शेख, कर्मचारी संजय राहिंज, अश्विनी काळे,वैशाली सासवडे उपस्थित होते.   या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment