विरोधी पक्ष नेते नामदार अजित दादा पवार कडून आ.लंकेची चौकशी व पाठिंबा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 8, 2022

विरोधी पक्ष नेते नामदार अजित दादा पवार कडून आ.लंकेची चौकशी व पाठिंबा.

 जोपर्यंत महामार्ग दुरुस्ती कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नाही आमदार निलेश लंके भूमिकेवर ठाम.

विरोधी पक्ष नेते नामदार अजित दादा पवार कडून आ.लंकेची चौकशी व पाठिंबा.


पारनेर -
गेल्या तीन वर्षापासून मनमाड,पाथर्डी व सोलापूर या तीन ही महत्वाच्या राष्ट्रीय मार्गाची गेल्या दोन वर्षापासून झालेली दुरावस्था झाले यासंबंधी अनेक वेळा संबंधित खात्याशी पत्र व्यवहार करू नये दखल घेतली जात नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी बुधवार दिनांक ७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला भाजप वगळता काँग्रेस शिवसेना आप मनसे वंचित बहुजन आघाडीसह बार असोसिएशन सर्वच पक्षांनी व सामाजिक संघटनांनी याला पाठिंबा व्यक्त केला आहे. तर आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाचा गुरुवारी दुसरा दिवस असून या उपोषणाला पाथर्डी शेवगाव कर्जत जामखेड नेवासा राहुरी व पारनेर नगर या मतदारसंघातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असताना दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय समोर असलेल्या या उपोषणाला पाथर्डी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता आमदार निलेश लंके यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चर्चा करण्यासाठी वेळ नाही का असे म्हणत मी उपोषणावर ठाम असल्याचे आमदार निरीक्षण त्यांनी आवर्जून सांगितले.तर दुसरीकडे या तीनही महामार्गावर दुस्ताभावी जवळपास ४०० ते ५०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून या रस्त्यावर मात्र अपघाताची मालिका अद्यापही चालूच आहे. त्यामुळे या तीन प्रमुख महामार्गाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी दुपारी १ वाजल्यापासून सुरू केले आहे. जिल्हाधिकारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने ते चर्चेसाठी येत नसल्याचा आरोपही आमदार निलेश संख्येने उपस्थित दरम्यान केला आहे.
त्यामुळे आमदार निलेश लंके यांनी बुधवारी सायंकाळी भजन संध्या चे आयोजन करून या उपासना दरम्यान गांधीगिरी सुरू केली आहे.
या आंदोलनाला माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे माजी आमदार दादासाहेब कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर घनश्याम शेलार सभापती नरेंद्र घुले माजी सभापती बाळासाहेब हराळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे अॅड श्याम असावा शेतकरी संघटनेचे रविराज जाधव अंबादास गारुडकर धनराज गाडे राजेंद्र दौड किसन चव्हाण रेणुका ताई पुंड अॅड हरिहर गर्जे शिवशंकर राजळे सतीश पालवे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर संजय लाकुडझोडे नगराध्यक्ष विजय औटी उपनगराध्यक्ष सौ सुरेखा भालेकर बा.ठ.झावरे रा.या.औटी जितेश सरडे डॉ बाळासाहेब कावरे  सतीश भालेकर अनिल गंधाक्ते दौलत गांगड यांच्या सह विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विखेंच्या बालेकिल्ल्यातून आमदार निलेश लंके यांना पाठिंबा..
लोणी खुर्दच्या कृषिभूषण तथा पंचायत सदस्या प्रतिमा घोगरे यांनी आमदार लंके यांची भेट घेत जाहीर पाठिंबा दिला त्या म्हणाल्या की नगर शिर्डी यावर अनेकांचे बळी आहेत काही  दिवसांपूर्वी पिंपरी निर्मळ येथील तरूणाचा मृत्यू घरातील कमवता मुलगा गेला. चाळीस वर्षे राजकारण करणायांनी केवळ आश्वासने दिली. रस्त्याची दुरवस्था झालेली असताना स्वतः हेलिकॉप्टरमधून फिरत आहेत. आमच्याकडे एक नाही तर चार आहेत ज्या गावात जायला रस्ताही हेलिपैड तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment