नगर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत कर्डिले गटाचे वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 20, 2022

नगर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत कर्डिले गटाचे वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का.

 नगर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत कर्डिले गटाचे वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का.

भाजप 18, राष्ट्रवादीकडे 6, शिवसेनेकडे 2 व काँग्रेसकडे 1 ग्रामपंचायत.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यात अत्यंत चुरशीने झालेल्या 26 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या गटाने वर्चस्व मिळविले. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपने 18 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. मतमोजणी ठिकाणी विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला.
नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी 26 ग्रामपंचायतीं-साठी रविवारी (दि.18) मतदान झाले होते. मतमोजणी आज सकाळी दहा वाजता येथील तहसील कार्यालयात सुरूवात झाली. दुपारी दीड वाजता सर्व निकाल हाती आला. तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जखणगाव, खातगाव, नांदगाव, नेप्ती, बाबुर्डी बेंद, पिंपळगाव कौडा, सोनेवाडी-चास, सारोळा कासार, दहिगाव, साकत, वडगाव तांदळी, राळेगण म्हसोबा, वाळकी, आठवड, मदडगाव, नारायणडोहो, सारोळा बद्दी, उक्कडगाव, कौडगाव, सोनेवाडी पिला, रांजणी, आगडगाव, पांगरमल, कापुरवाडी, शेंडी या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली. पिंपळगाव लांडगा गावाची निवडणूक याआधीच बिनविरोध पार पडली होती. 26 ग्रामपंचायतींपैकी बहुतांश मोठ्या ग्रामपंचायतींवर कर्डिले गटाने झेंडा फडकवला आहे. कर्डिले गटाने 18 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली असून राष्ट्रवादीने 6, शिवसेनेने 2 तर काँग्रेसने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिध्द केले आहे.
टाकळी खातगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी समसमान मते मिळाली होती. त्यामुळे निवडणूक प्रशासनाकडून चिठ्ठीव्दारे विजय घोषित करण्यात आला. आसमा शेख व प्रिती नरवडे हे सदस्य चिठ्ठीव्दारे विजयी जाहीर करण्यात आले.
जखणगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग दोनमध्ये उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली होती. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने नोटानंतर दुसर्यास्थानी मते मिळालेल्या उमेदवारास विजयी घोषित केले. या प्रभागात सुनील झिरवडे व अरूण सुर्यवंशी हे दोन उमेदवार होते. झिरवडे यांना नोटानंतर दुसर्या क्रमांकाची 144 मते तर सुर्यवंशी यांना 112 मते मिळाली होती. त्यामुळे झिरवडे यांना विजयी घोषित करण्यात आले.

No comments:

Post a Comment