आ.लंके व जितेश सरडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

आ.लंके व जितेश सरडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा !

 गौरव वांढेकर राज्य कर निरिक्षक तर वैभव पडवळ विक्रीकर व मंत्रालय कक्ष अधिकारी.

आ.लंके व जितेश सरडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा !

मिरविण्यासाठी नव्हे तर सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार
ज्यांच्या शुभेच्छा मुळे मला अभ्यास करण्यासाठी व माझे ध्येय साध्य करण्यासाठी ऊर्जा मिळते त्या तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील जनतेचे प्रेम पाठबळ, सर्व शिक्षकांचा आशिर्वाद व मार्गदर्शन तसेच आई, वडील नातेवाईक मित्रपरिवार यांची प्रेरणा व उच्च शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ मिळाल्याने आपण राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमाकांने उत्तीर्ण झालो असून राज्यसेवेत अधिकारी म्हणून कार्यरत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही गौरव वांढेकर यांनी बोलताना दिली आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः राज्य व देश पातळीवर घेतल्या जाणार्‍या स्पर्धा परीक्षां मध्ये प्रत्येक वर्षी पारनेर तालुक्यात अनेक गुणवंत विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत तालुक्याचे नाव देशभर पोचवत आहेत असेच याही वर्षी मतदारसंघातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत निघोज येथील गौरव वांढेकर यांची राज्यकर निरिक्षकपदी निवड झाली असुन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमाकांने उत्तीर्ण झाला आहे.
      पारनेर तालुक्यातील निघोज येथील गौरव वसंत वांढेकर यांची राज्यकर निरिक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत राज्यात सहाव्या क्रमाकांने ते उत्तीर्ण झाले आहेत.त्यांचे प्राथमिक शिक्षण पारनेर सहकारी साखर कारखाना शाळेत तर माध्यमिक शिक्षण आळकुटी येथील साईनाथ विद्यालयात झाले आहे.इंजिनीअरिंग डिप्लोमा अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथे झाला आहे.अभियांत्रिकी शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे तसेच 2018 पासून लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरू केला.
दोन वर्ष कोरोना काळात शिक्षणाची हेळसांड झाली. राज्यसेवेने हुलकावणी दिली. विशेष म्हणजे कुठलीही खाजगी शिकवणी न लावता घरीच अभ्यास केला. वडील वसंत वांढेकर हे पारनेर साखर कारखान्याचे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आई नंदाताई या गृहिणी आहेत. अतिशय प्राप्त परिस्थितीत शिक्षण घेत गौरव यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक मिळवल्या बदल त्यांचे पारनेर, शिरूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
त्याच बरोबर लोणी मावळा येथील  सामान्य कुटूंबातील विद्यार्थी वैभव पडवळ यांनी मे 2022 मध्ये जाहीर झालेल्या चझडउ परीक्षेच्या निकालातून पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 21 व्या वर्षी सहायक गटविकास अधिकारी पदी निवड जाहीर झाली असुन ािील परीक्षेच्या निकालातून झडख शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी निवड जाहीर झालेल्या चिील च्या निकालातून राज्यात 13 व्या क्रमांकाने विक्रीकर अधिकारी पदी व राज्यात 17 व्या क्रमांकाने मंत्रालय कक्ष अधिकारी पदी निवड झाली आहे . लोणीमावळा या छोट्याशा गावात आपल्या आयुष्याच्या बाराखडीची सुरुवात करणार्‍या वैभव पडवळ हे लहानपणा पासूनच अभ्यासात अतिशय हुशार म्हणून त्यांची ख्याती आहे ई.3 री मध्ये मंथन प्रज्ञाशोध-जिल्ह्यात 14 वा इ.4 थी शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यात 1 ला
इ.5 वी - नवोदय विद्यालय निवड, इ.6 वी - हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात -1 ला, इ. 7 वी - शिष्य. परीक्षा- राज्यात दुसरा ( ग्रामीण भागातून राज्यात पहिला )इ. 8 वी , 9 वी , 10 वी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत तिनही वर्षी राज्यात पहिल्या 10 क्रमाकाने गुणवत्ता यादीत स्थान 10 वी ला छढडए परीक्षा उत्तीर्ण
10 वी मध्ये 96.80 % गुण मिळवून रयत शिक्षण संस्थेच्या नाशिक ( उत्तर महाराष्ट्र ) विभागातून प्रथम क्रमांक ,12 वी - 80.62% गुण
चक-उएढ उत्तीर्ण होऊन उजएझ ( कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ) इथे नंबर लागला. पण इंजिनियरिंगचा प्रवेश नाकारुन धला ( यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ) येथे प्रवेश घेऊन 81.25% गुणांनी इ.-.उत्तीर्ण होत लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत वयाच्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नातून  इऊज , -डज व डढख या 3 पदांवर शिक्कामोर्तब करत आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली आहे .
अभ्यासा सोबत खेळातही चमक दाखवीनारे पडवळ यांनी राज्यस्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात खेळताना - 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेॠ त्याच स्पर्धेत खेळताना 200 मी. धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन रौप्य पदक मिळवून राज्याच्या नकाशावर पारनेरचे नाव झळकावले.
तसेच राज्यातील वेगवान धावपटूचा किताब पटकावला.पारनेर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन 2013 साली -3 रा क्रमांक पटकावला.
कूहू स्पोर्ट्स या खाजगी कंपनीने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला व सदर कंपनीने देशभरातून ऑस्ट्रेलियाला प्रशिक्षणासाठी निवडलेल्या खेळांडूमध्ये त्यांची निवड करण्यात आली .आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीवर मात करत सामान्य कुटुंबातील हे दोन्हीही  गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदीप्यमान यशामुळे पारनेर तालुक्यात चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरले आहेत .पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे राज्याचे अध्यक्ष जितेश सरडे यांनी या दोन्हीही गुणवंत अधिकार्‍यांचे कौतुक करत आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी व पारदर्शक प्रशासन चालवण्यासाठी करावा अशा शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment