कोंभळी फाटा ते कर्जत या कामाची पाहणी : शेखर खरमरेची तक्रारिवर विशेष तपासणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

कोंभळी फाटा ते कर्जत या कामाची पाहणी : शेखर खरमरेची तक्रारिवर विशेष तपासणी.

 कोंभळी फाटा ते कर्जत या कामाची पाहणी : शेखर खरमरेची तक्रारिवर विशेष तपासणी.

उत्कृष्ट काम करून घेण्याची, वेळेत काम करून घेण्याची व कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व त्याच्या अधिकार्‍यांची असताना या बाबीकडे ते का गांभीर्या ने पाहत नाहीत हा प्रश्न असून खराब झालेल्या कामाला दुरुस्तीची मलमपट्टी करण्याच्या सूचना दिल्या जातात मात्र तो रस्ता लवकर का खराब झाला व त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणार्‍या अधिकार्‍यांवर जबाबदारी का निश्चित केली जात नाही हा खरा संशोधनाचा व पाठपुराव्याचा मुद्दा आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः  कोंभळी फाटा ते कर्जत या हायब्रीड अन्युटी या योजनेत होत असलेल्या मार्गाचे काम गुणवत्तापूर्ण होत नसल्याची तक्रार भाजपाचे तालुका सरचिटणीस शेखर खरमरे यांनी केल्यानंतर या कामाची स्वतंत्र गुणवत्ता एजन्सी मार्फत तपासणी करण्यात आल्याची माहिती खरमरे यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील कोंभळी फाटा ते कर्जत या हायब्रीड अन्युटी या रस्त्याला आ. राम शिंदे यानी खास परवानगी आणली होती, सदरच्या कामाला महाविकास आघाडीच्या काळात सहकार्य न झाल्याने कामास खूप विलंब झाला होता राज्यात सरकार बदल झाल्या नंतर वनविभागातुन आता 5.50 एवढ्या रुंदीच्या रस्त्या साठी परवानगी दिलेली असताना हे काम लवकरात लवकर आणि गुणवत्ता पूर्ण व्हावे म्हणून आ. प्रा राम शिंदे यांनी या रस्त्यावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदार आणि प्रशासन यांना गुणवत्ते संदर्भात योग्य त्या सूचना केल्या होत्या .. रस्ता कामाची देखभाल दुरुस्ती सदरहू काम करणार्‍या एजन्सीकडे 10 वर्षासाठी आहे परंतु त्याचा अर्थ असा नाही कि काम निकृष्ट करायचे आणि मग वेळोवेळी खड्डे बुजवत बसायचे तर कामच गुणवत्ता पूर्ण करणे अपेक्षित आहे अशा शब्दांत आ. राम शिंदे  यांनी सुनावले होते. या कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित एजन्सी कानाडोळा करत असल्याची तक्रार भाजपाचे तालुका सरचिटणीस श्री शेखर खरमरे यांनी प्रशासनाकडे  केली होती, त्याची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे, अभियंता शिंदे, स्वतंत्र गुणवत्ता एजन्सी अभियंता विशाल चव्हाण यांनी खरमरे बरोबर प्रत्यक्ष साइटवर पाहणी केली.
सदरहू रस्त्याच्या कामाच्या पुलाच्या पाईपखाली क्राँक्रीट न टाकता फक्त मातीत पाईप टाकलेले आहेत त्यासाठी कोणतेही तांत्रिक गोष्टी पाहिलेल्या नाहीत. त्याचा उतार, त्याची उंची याबाबत प्रशासनालाही अंधारात ठेवून काम केलेले आहे. माती बांधावरच सरळ सरळ डांबर टाकणेत आलेले आहे. मातीच्या ठिकाणी खडी न टाकता तसेच डांबरीकरण करणेत आलेले आहे. रस्त्याच्या बाजूला मातीचे भराव करून साइड पट्टी करणेत आलेली आहे अशा अनेक तक्रारी खरमरे यांनी केल्या असून या सर्व गोष्टीची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी या सर्वांना करायला लावली आणि या कामात निश्चितपणे अनियमितता होत आहे आणि गुणवत्ता डावलून सदरहू एजन्सी काम करत आहे असे मत प्रशासनाचे अधिकारी आणि स्वतंत्र गुणवत्ता एजन्सीचे अभियंता यांनी ही मान्य केले असल्याचे खरमरे यांनी आमच्या प्रतिनिधीना सांगितले, सदरहू एजन्सीला पुलाचे निकृष्ट  झालेले काम पुन्हा करण्याच्या आणि डांबरीकरण मातीवर न करण्याच्या सूचना प्रशासनातर्फे करणेत आल्या परंतु यासंदर्भात सदरहू एजन्सी प्रशासनाचे ही ऐकत नसल्याचे जाणवते आहे, असा आरोप खरमरे यांनी केला आहे. याप्रसंगी  उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे, नंदकुमार नवले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment