उड्डाण पुलावर पादचारी, हातगाडीवाले, जनावरांना बंदी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

उड्डाण पुलावर पादचारी, हातगाडीवाले, जनावरांना बंदी.

 उड्डाण पुलावर पादचारी, हातगाडीवाले, जनावरांना बंदी.

आजपासून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाल्यांना जाता येणार नाही ,जनावरे नेता येणार नाहीत. तसेच त्यावर थांबून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) नुसार कारवाई करण्यात येणार असून आज पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
उड्डाण पूलावर पायी चालणारे नागरिक, हातगाडी वाले, गाया म्हशी घेऊन चालणारे नागरिक गेल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. उड्डाणपूल झाल्यापासून अनेकांनी नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने गेल्या पाच दिवसांत 35 कारवाया केल्या आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सांगितले.
चारचाकी व अन्य वाहनांसाठी हा पूल तयार करण्यात आला. मात्र, त्यावरून कोणी पायी,कोणी हातगाडी घेऊन गेले. काहींनी तर चक्क जनावरांनाही त्यावरून सफर घडविली. त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यातच दोन दुचाकीस्वारांची उड्डाणपुलावरील भांडणेही वायरल झाली. त्यामुळे शहरातील वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर आता नगरकरांना दिलेली सूट पुरे म्हणत जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांनी पुलावरील वाहतुकीबाबत स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांव्यतिरिक्त कोणालाही त्यावरून प्रवास करता येणार नाही. उड्डाणपूल शहरातील पर्यटनस्थळांपैकी एक होऊन बसता. सकाळी- सायंकाळ पायी फिरणार्‍यांना जणू नवीन ठिकाण मिळाले. यात फेरीवाले मागे कसे? त्यांनीही पुलावर हातगाडी नेण्याचा प्रयोग केला. लीक पायी जातात म्हणून काही गुराख्यांनी म्हनाच पुलाची सफर घडवली. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

No comments:

Post a Comment