वाळकी कृषी मंडळ अधिकारी पदावर नारायण करांडे यांची पदोन्नती..
गुंडेगाव प्रतिनिधी : नगर तालुक्यातील वाळकी मंडळ कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले करांडे नारायण किसन यांची वाळकी मंडळ कृषी अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात विविध पदांवर काम करत असतांनाच वाळकी मंडळ कृषी अधिकारी पदावर करांडे यांची पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानिमित्ताने तालुका कृषी विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून करांडे यांनी वाळकी कृषी मंडळाच्या अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न केले आहे.कृषी पर्यवेक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी फळबाग लागवड, शेततळे, कांदा चाळ, विविध शेती औजारे यांसारख्या विविध विकास योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे .आंबा कलम करणे या सारखे वेगळे प्रयोग करून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रत्यक्ष बांधावर जावून प्रयोग केले. नारायण करांडे यांची कृषी अधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे . यावेळी गुंडेगावचे सरपंच, उपसरपंच संतोष भापकर, कृषी सहायक डी.पांडुळे , ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर, सतिश चौधरी, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमन पंडित भापकर, भाऊसाहेब भापकर, प्रदीप भापकर, दिलीप धावडे , विकास हराळ, संभाजी जाधव, पत्रकार संजय भापकर अदि ग्रांमस्थ व शेतकर्यांनी करांडे साहेब यांचे अभिनंदन केले आहे.Post Top Ad
Tuesday, November 22, 2022

वाळकी कृषी मंडळ अधिकारी पदावर नारायण करांडे यांची पदोन्नती..
Tags
# Ahmednagar
# Nagar
Share This

About नगरी दवंडी
Nagar
लेबल्स
Ahmednagar,
Nagar
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment