नगरकरांना कायमस्वरूपी पूर्ण दाबाने पाणी मिळणार ः महापौर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 24, 2022

नगरकरांना कायमस्वरूपी पूर्ण दाबाने पाणी मिळणार ः महापौर.

 नगरकरांना कायमस्वरूपी पूर्ण दाबाने पाणी मिळणार ः महापौर.

अमृतपाणी योजना पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण!
वसंत टेकडी येथील 68 लाख लिटर जुन्या पाण्याच्या टाकीच्या कामाची महापौरांकडून पाहणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुळा धरणातून अमृत पाणी योजनेचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले असून काम पूर्ण झाल्यावर लवकरच हे पाणी वसंत टेकडी येथे जुन्या टाकीमध्ये पडणार आहे. त्यामुळे सुमारे एकशे दहा लाख लिटर पाणी नगरकरांना प्रतिदिन मिळणार असून त्यामुळे संपूर्ण नगर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. फेज टू योजनेमधील विविध भागातील टाक्या कार्यान्वित होणार असून  नगर शहराचा अनेक दिवसाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे तसेच नगरकरांना पूर्ण दाबाने मिळणार असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले आहे.
वसंत टेकडी येथील 68 लाख लिटर क्षमता असलेल्या टाकीची पाहणी आज महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केली. यावेळी शेंडगे म्हणाल्या की, नगर शहराला वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. अनेक वर्षाची ही टाकी असल्यामुळे तिची गळती मोठ्या प्रमाणात सुरू होती त्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच या द्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे. तसेच दुसर्‍या टप्प्याचे कामही डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. नगर शहराला 68 लाख लिटर पाण्याची टाकी व 50 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे, त्यामुळे वसंत टेकडी येथील जुन्या 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केली.
 यावेळी महिला बाल कल्याण सभापती पुष्पाताई बोरुडे, शहर प्रमुख संभाजी कदम,माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक शाम (अप्पा) नळकांडे, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गेणाप्पा, परेश लोखंडे, अभियंता गणेश गाडळकर, कार्यकारी अभियंता अजय मुळे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी जय बिवाल,शाखा अभियंता महाराष्ट्र सतीश बडे, जीवन प्राधिकरण अधिकारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment