शहरातील प्रमुख डी.पी रस्ते व शहरातून जाणार्‍या महामार्गासाठी निधी उपलब्ध करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, November 21, 2022

शहरातील प्रमुख डी.पी रस्ते व शहरातून जाणार्‍या महामार्गासाठी निधी उपलब्ध करा.

 शहरातील प्रमुख डी.पी रस्ते व शहरातून जाणार्‍या महामार्गासाठी निधी उपलब्ध करा.

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींना महापौरांचे निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
नगर शहरातून पुणे, औरंगाबाद, कल्याण-मुंबई, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, मनमाड, नाशिककडे जाणार्या महामार्गांवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यातील बहुतांश रस्ते हे राष्ट्रीय महामार्गामध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्यातील काही रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत व काही सुरू आहेत. परंतु, डीएसपी चौक ते पत्रकार चौक, पत्रकार चौक ते विळद बायपास चौक, स्टेट बँक चौक ते तपोवन परिसरापर्यंतचा नगर-औरंगाबाद महामार्ग आदी काही रस्त्यांची नव्याने कामे करणेही आवश्यक असून शहराचा वाढता विस्तार व त्यादृष्टीने दळवळणाच्या सुविधा बळकट करण्यासाठी अस्तित्वातील रस्त्यांचा विकास व नव्याने विकास योजनेतील रस्त्यांची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. केंद्र सरकारमार्फत या रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी  मागणी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली आहे.
दिलेल्या निवेदन असे म्हटले आहे की, अहमदनगर शहर झपाट्याने विकसित होत आहे. दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे, त्यामुळे परिसरातील उपनगरांमध्ये नवीन वसाहती निर्माण होत आहे. परिणामी, या भागात पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. शहरातील उड्डाणपुलामुळे या भागातील रहदारी कमी होण्यास निश्चितच फायदा होणार आहे. आपल्या सहकार्यामुळे अहमदनगर शहराचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढून इतर प्रमुख रस्त्यांवरील रहदारीही वाढत आहे. त्यादृष्टीने अस्तित्वातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व विकास योजनेतील मंजूर रस्ते नव्याने विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. शहराच्या केडगाव, कल्याण रोड, बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, तपोवन रोड यासह शहरालगत असलेल्या भिंगार परिसरातील मोठे व प्रमुख रस्ते विकसित झाल्यास शहरातील अंतर्गत दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल.
नितीन गडकरी यांचेकडे करण्यात आलेल्या मागणींचे रस्ते पुढीलप्रमाणे - मार्केट यार्ड चौक ते तुळजाभवानी मंदिर ते बंगालचौक रस्ता विकसीत करणे, माळीवाडा वेस ते वसंत टॉकीज रस्ता विकसीत करणे, पंचपीर चावडी ते कापड बाजार ते सर्जेपुरा डांबरीकरण करून रस्ता विकसीत करणे, जूनी मनपा कार्यालय ते दिल्ली गेट वेस रस्ता विकसीत करणे, झोपडी ते गंगा उद्यान ते औरंगाबाद रस्ता विकसीत करणे, न्यू आटर्स कॉलेज ते अप्पू चौक ते पत्रकार चौक रस्ता विकसीत करणे, नगर वाचनालय ते लक्ष्मीबाई कारंजा ते पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगन-अमरधारम रस्ता विकसीत करणे, सनफार्मा शाळा ते आंबेडकर चौक ते गणेश चौक ते सीना नदी - गटर करणे, मनमाड रोड ते बंधन लॉन ते भिस्तबाग तलाठी कार्यालय ते सरस्वतीधाम-फणसे मळा राजनंदीनी हॉटेल ते पिंपळगांव रस्ता विकसीत करणे, एकवीरा चौक ते तपोवन रोड (जूना पिंपळगांव रोड) रस्ता विकसीत करणे, कायनेटीक चौक ते मल्हार चौक रस्ता काँक्रीटीकरण करणे, नेप्ती रोड नगर फर्नीचर ते आदित्य हेरिटेज क्लॉम्पेक्स रस्ता विकसीत करणे, अर्चना हॉटेल ते बायपास चौक रस्ता विकसीत करणे, लिंक रोड - गारुडकर दुकान ते पोतदार शाळा रस्ता विकसीत करणे, नामदेव चौक ते पाऊलबुध्दे शाळा ते भगवानबाबा चौक ते तपोवन रस्ता विकसीत करणे, मुळे ते घर अनुसया नगर कमान ते रेल्वे लाईन पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण काँक्रीटीकरण करणे, कल्याण रोड माधव नगर ते वारुळाचा मारुती रोड पर्यंतचा रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण करणे, भावनाऋषी सोसायटी मधील कल्पक आर्ट ते माधव नगर पर्यंत गटार सहित रस्ता विकसित करणे, जिजाऊ नगर मधील डीपी रस्ता विकसित करणे.

No comments:

Post a Comment