प्रत्येक भागाच्या विकासाला चालना देणार ः महापौर रोहिणी शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 11, 2022

प्रत्येक भागाच्या विकासाला चालना देणार ः महापौर रोहिणी शेंडगे

 नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड विणकर सोसायटीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

प्रत्येक भागाच्या विकासाला चालना देणार ः महापौर रोहिणी शेंडगे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
शहरातील प्रत्येक भागाचा विकास झाला तर शहराचा विकास होत असतो. नगर-कल्याण रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मिळत असलेल्या मुलभूत सुविधांमुळे येथील नागरी वस्ती वाढत आहे. येथील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध असून, या भागात जास्तीत जास्त कामे कशी होतील, याकडे विशेष लक्ष देत आहे.  या भागाचे प्रतिनिधीत्व मीही करत असल्याने प्रत्येक भागाच्या सर्वांगिण विकासासाठी जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. या भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट याबरोबरच प्रत्येक भागाचा विकास करण्यात येणार आहे. प्रभागातील नगरसेवकांच्या समन्वयातून प्रत्येक भागाच्या विकासाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड, प्रभाग क्र.8 विणकर सोसायटी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, पारुनाथ ढोकळे, मार्कस् भांबळ, बापू शेडाळे, शारदा गडाख, वैशाली नळकांडे, भाग्यश्री ढाकणे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी शाम नळकांडे म्हणाले, प्रभागातील प्रत्येक भागाला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सर्वोतोपरि प्रयत्न सुरु आहेत. सहकारी नगरसेवक आणि महापौरांच्या माध्यमातून या भागात जास्तीत जास्त कामे कशी मार्गी लागतील यासाठी प्रयत्नशिल आहोत. नागरिकांच्या मागणीनुसार प्रत्येक भागातील कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येत आहे. मागील काळात ड्रेनेज, स्ट्रीट लाईट आदिंची कामे करण्यात आली आहे, आता रस्त्यांच्या कामांना प्राध्यान देण्यात येत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी संजय शेंडगे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार बापू शेडाळे यांनी आभार मानले. यावेळी गोरख भालके, योगेश बेंद्रे, दीपक गडाख, मन्सूर शेख, मनोजकुमार यादव, अशोक ढाकणे, हनुमान ढाकणे, सुशांत शिंदे, कृष्णा शिंदे, ज्ञानेश्वर गुंडू, कृष्णा दोंता, काशीनाथ वारे, रवि टिपरे, तहसील खान, स्वप्निल लाहोर, सतिश महालकर, मनीषा जपकर, सुमन भांबळ, पुनम बेंद्रे, रबिया तांबोळी, संगीता काटकर, रेखा बोरुडे, अनिता शिंदे, गीता सोनवणे, लक्ष्मी मुत्याल, सोनाली वाजे, अनिता सोनवणे, सुनंदा बेग, पद्मावती तिरमल, संगीता दोंततुल, माया असलकर, प्रभावती महालकर, शबाना शेख, मीना शिंदे, बिंदा अग्रवाल, रबिया सय्यद, मेहबुबी तांबोळी, रेखा पवार, सविता भंडारी, सोनम राका, सविता दौंड, सविता शिंदे, मनीषा खांदवे, संगीता शिंदे, उज्ज्वला जाधव, सुरेखा चखाले, नसरीन शेख, जयश्री लांडगे, लावण्या बिल्ला, नंदा भांबळ, भारती मेरगू, विणकर सोसायटी मधील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

No comments:

Post a Comment