छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्याचा संकल्प. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, November 14, 2022

छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्याचा संकल्प.

 महापुरुषांच्या पुतळ्या संदर्भात महापौरांनी घेतली आढावा बैठक.

छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्याचा संकल्प.


अहमदनगर -
महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा, मार्केट यार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा, प्रोफेसर कॉलनी छत्रपती संभाजी महाराज यांचा, माळीवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभारणी संदर्भात आज महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापौर कार्यालयात आढावा बैठक घेवून शहरांमध्ये बसविण्यात येणार्‍या राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्या संदर्भात आढावा घेवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी मा.महापौर सौ.रहिणीताई शेंडगे यांनी शहरामध्ये बसविण्यात येणा-या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळया संदर्भात आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता श्री सुरेश इथापे यांनी राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळे बसविणे बाबतच्या कार्यालयीन कामकाजाबात माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपा आवारात बसविण्यात येणार असून या पुतळयासाठी चौथरा व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा प्रोफेसर कॉलनी चौकात बसविण्यासाठी चौथ-याच्या परवानगीसाठी चिफ आर्किटेक्चर व मा.शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा मार्केट यार्ड चौकात बसविण्याबाबतचे कार्यालयीन सोपास्कार पार पाडण्याबाबत सुचना दिल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळयाचे सुशोभिकरणासह संकल्पचित्र मागविण्याबाबत प्रसिध्द करण्यात यावे. माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी या ठिकाणी अर्धाकृती पुतळयाच्या जागी पुर्णाकृती पुतळा बसविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात यावी अशा सुचना दिल्या.
यावेळी उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळयासाठी चौथ-याचे निविधा प्रसिध्द करण्यात यावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविणेसाठी विविध आर्किटेक्चर कडून सुशोभिकरणासह संकल्प चित्र मागविण्याबाबत कार्यवाही करावी. महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा आहे त्या ठिकाणी बसवायचा असल्यामुळे त्याबाबत लवकर कार्यवाही सुरू करावी.
मा.आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सुशोभिकरणासह संकल्पचित्र मागविणेबाबत कार्यवाही करावी. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा चोथरा उभारणे बाबत कार्यालयीन कार्यवाही करावी. महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे बाबतची कार्यवाही तातडीने करणेबाबत सुचना दिल्या
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे बाबत मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी आज दि रोजी सकाळी 11-30 वा.मा.महापौर कार्यालय येथे आढावा बैठक घेतली यावेळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त मा.डॉ. पंकज जावळे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक शाम नळकांडे, उपायुक्त यशवंत डांगे, सहाय्यक संचालक नगररचनाकार राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख आर.जी.सातपुते,उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे आदी उपस्थित होते.

1 comment:

  1. If you need longer, just e mail us at and we'll make certain to hold it longer for you. Once your mannequin is in good condition and is ready to|is ready to} be printed, you will be be} emailed a printing estimate. Once you reply to that estimate, your part will be added to the print queue for first come, first serve printing. In some situations, we find a way to|could possibly|might have the ability to} mix print jobs with other users that will save on the overall print time. The mesh or floor of the 3D mannequin must be watertight and a stable. More technically, all faces of the item high precision machining should construct a number of} closed quantity entities.

    ReplyDelete