माहिलांना पुढे जाण्यासाठी सामाजिक,आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे - प्रा. कैलास माने. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 11, 2022

माहिलांना पुढे जाण्यासाठी सामाजिक,आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे - प्रा. कैलास माने.

 थांगता स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थीनींचे ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल च्या वतीने सत्कार.

माहिलांना पुढे जाण्यासाठी सामाजिक,आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे - प्रा. कैलास माने.


जामखेड -
जामखेड शहरातील बिड रोड येथील ऑक्सफर्ड इंग्लिश मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या २६ वी राज्यस्तरीय थांगता स्पर्धेमध्ये उत्तम प्रकारे यश प्राप्त केलेल्या विद्यार्थीनींचे सत्कार करण्यात आले.
यामध्ये कु.कोमल डोकडे - सुवर्ण पदक,कु.दिक्षा पंडीत - रौप्यपदक,कु.मोहिनी शिरशीरे - कांस्यपदक,कु.सुवर्णा भैसडे - कांस्यपदक ,कु. ईशा पारखे - रेफरी मार्गदर्शक या सर्वांच्या यशाबद्दल ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल चे संस्थापक अध्यक्ष प्रा.कैलास माने (सर) यांनी अभिनंदन केले.
यावेळी प्राचार्य उगले म्हणाले, " विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच पुरेसा व्यायाम, सकस आहार व अभ्यासात नियमितपणा ठेवावा. आपले बोलणे, चालणे, वागणे आदर्शवत ठेवावे. अपयशाची भीती न बाळगता स्पर्धेत उतरावे. स्वतःस सिद्ध करावे चांगल्या सवयी व चांगले विचार आपणास आयुष्यात यश प्राप्त करून देतात व हाच यशस्वी होण्याचा मंत्र आहे. यासाठी आमच्या शाळेकडून शुभेच्छा दिल्या.
दिक्षा पंडीत यावेळी म्हणाली कि थांगता स्पर्धेसाठी पंधरा दिवसा ची ट्रेनिंग घेऊन राज्यस्तरीय नमस्कार स्पर्धेत रौप्य पदक मिळविले या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून श्री. उदमले सर व श्री. शाम पंडित यांनी मार्गदर्शन केले. थांगता स्पर्धेत दोन प्रकार आहेत यामध्ये स्टाईल 1 यामध्ये ढाल व तलवार तसेच स्टाईल 2 मध्ये किक व तलवार थांगता स्पर्धेत पाँईट घेऊन तलवारी ने अँटक करावे लागते हा खेळ सहा वर्षा पासुन मुले खेळु शकतात.  याप्रसंगी प्राचार्य अभिजीत उगले (सर) व ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल चे सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी व विद्यार्थीनीं  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


''क्रिडा क्षेत्रात ग्रामीण भागातील  महिलांचे योगदान दिवसेंदिवस मोलाचे ठरत आहे. पंरतू या माहिलांना पुढे जाण्यासाठी सामाजिक,आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment