जामखेड वाहतूक शाखेची दमदार कामगिरी दहा महिन्यात केला 23 लाखांचा दंड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 3, 2022

जामखेड वाहतूक शाखेची दमदार कामगिरी दहा महिन्यात केला 23 लाखांचा दंड.

 जामखेड वाहतूक शाखेची दमदार कामगिरी दहा महिन्यात केला 23 लाखांचा दंड.


जामखेड - 
जामखेड शहरात वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी सरसावलेल्या जामखेड वाहतुक शाखेने गेल्या दहा महिन्यांत तब्बल 1965 केसेस करत तब्बल 23 लाखांचा दंड वसुल करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काँस्टेबल अजिनाथ जाधव यांच्या टीमने केली.
वाहतूक नियम तंतोतंत पाळले जावेत यासाठी जिल्हा वाहतूक शाखेतर्फे व संबंधीत पोलीस ठाण्यांतर्फे कारवाई केली जाते. वाहतूक नियमांचा भंग झाल्यास अपघात व्हायला वेळ लागत नाही. वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी जामखेड वाहतूक पोलीसांनी जामखेड शहरात वाहतुक शिस्त लावण्यासाठी सरसावलेल्या जामखेड वाहतुक शाखेने गेल्या दहा महिन्यांत तब्बल 1965 केसेस करत तब्बल 23 लाखांचा दंड वसुल करण्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काँस्टेबल अजिनाथ जाधव यांच्या टीमने केली. 
जामखेड वाहतुक शाखेचे कर्मचारी पोलिस काँस्टेबल अजिनाथ जाधव, पोलिस काँस्टेबल दिनेश गंगे, तसेच होमगार्ड रफिक तांबोळी यांच्या माध्यमांतून वाहतुक सुधारण्यासाठी शहरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला होता, तसेच शहरात दुचाकी पार्किंगसाठी शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोरी लावल्या, तसेच शहरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावले यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला. 

दरम्यान,जामखेड वाहतुक शाखेने गेल्या 10 महिन्यात 3936 कारवाया करत वाहतुकीस शिस्त लावली, अहमदनगर जिल्ह्यात जामखेड वाहतुक शाखेची कारवाई सर्वात मोठी आहे. 

1 जानेवारी 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 

1) विना हेल्मेट  - 91 केसेस, 45 हजार 500 दंड 

2) ट्रीप्लसीट -  60 केसेस 60 हजार दंड

3) विदाऊट शिट बेल्ट - 228 केसेस 45 हजार 600 दंड

4)  नो पार्किंग - 2714 = 15 लाख 63 हजार दंड

5) वाहन चालवताना फोनवर बोलणे -  39 केसेस, 39 हजार दंड 

6) फॅन्सी नंबर - 12 केसेस 12 हजार दंड

7) ब्लॅक काच - 57 केसेस - 23 हजार 500 दंड

8) विदाऊट इन्सुरन्स 27 केसेस 58 हजार दंड 

9) इतर गुन्हे  - 6 लाख दंड वसुल 

10) एकुण दंड वसुल = 22 लाख 72 हजार 700 रूपये

No comments:

Post a Comment