पारनेरला कुस्तीची उज्वल परंपरा ः माजी सभापती राहुल झावरे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 30, 2022

पारनेरला कुस्तीची उज्वल परंपरा ः माजी सभापती राहुल झावरे.

 पारनेरला कुस्तीची उज्वल परंपरा ः माजी सभापती राहुल झावरे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः न्यू आर्टस् , कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांचे आयोजन पारनेर तालुका क्रिडा समितीच्या वतीने करण्यात आले होते.या तालुकास्तरीय शालेय कुस्ती क्रिडास्पर्धेत 150 हून जास्त कुस्ती स्पर्धकांनी सहभाग नोंदवला . तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पारनेर पंचायात समितीचे माजी.सभापती राहुल झावरे पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी राहुल झावरे म्हणाले की, पारनेर तालुक्यास कुस्तीची मोठी परंपरा आहे . कुस्ती स्पर्धेमुळे पारनेरच्या वैभवात भर पडली आहे . कोरोनासारख्या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शालेय क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नव्हते चालू शैक्षणिक वर्षात पून्हा क्रिडा  स्पर्धां घेण्यास शासनाने मान्यता दिल्याने सहभागी खेळाडूंमध्ये उत्साह दिसून येत आहे . त्यामुळे सर्व सहभागी खेळाडूंनी सर्व नियमांचे पालन करून खिलाडूवृत्तीने कुस्ती खेळण्याचे आव्हान करुन स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .
यावेळी न्यू आर्टस् , कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज  पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . रंगनाथ आहेर यांनी सर्व सहभागी खेळडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . सदर कार्यक्रमासाठी न्यू आर्टस् , कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेरचे उपप्राचार्य डॉ.दिलिप ठुबे, तालीम संघाचे अध्यक्ष श्री युवराज पठारे , जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य ,श्री किरण ठुबे ,न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य  बाळासाहेब करंजुले , तालुका क्रिडा समिती अध्यक्ष बापूराव होळकर , कार्यालयीन अधिक्षक सावकार काकडे , डॉ.संजय गायकवाड , तसेच पारनेर तालुक्यातील विविध शाळांमधील क्रिडा शिक्षक  व सहभागी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रिडा शिक्षक गंगाराम खोडदे यांनी केले. सर्वांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक संजय कोल्हे यांनी मानले.

No comments:

Post a Comment