प्रयोगशाळेबरोबरच स्पर्धापरीक्षा केंद्र उभारण्याचं काम करेन ः आ. लहामटे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 30, 2022

प्रयोगशाळेबरोबरच स्पर्धापरीक्षा केंद्र उभारण्याचं काम करेन ः आ. लहामटे.

 प्रयोगशाळेबरोबरच स्पर्धापरीक्षा केंद्र उभारण्याचं काम करेन ः आ. लहामटे.

आम्ही पोस्टमनची भूमिका साकारण्याचे काम करत असतो ः डॉ. विश्वास आरोटे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व व आदरणीय नेते स्वर्गीय अनंत म्हात्रे व संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी कीर्ती ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून भाविकांना विविध पर्यटन स्थळांच्या सहली घडविण्याचे पुण्य कर्म केले असे प्रतिपादन आ. किरण लहामटे यांनी केले.
स्व.अनंत म्हात्रे व स्व.चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदिवासी महिलांना साडी व  विद्यार्थ्यांना  मिष्ठांन्न वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न! .सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट . डॉ.किरणजी लहामटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ विश्वासराव आरोटे उपस्थित होते.
यावेळी स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार  डॉ. किशोर बळीराम पाटील, दैनिक समर्थ गांवकरी प्रतिनिधी आर एस पी कमांडर डॉ.रतिलाल शिंपी, भिवंडी पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, , जेष्ठ पत्रकार  श्रीनिवास सिरीमल्ले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोक उगले उपाध्यक्ष ललित मुतडक, वसंत सोनवणे प्रसिद्धी प्रमुख सुनील  शेणकर, पत्रकार नितीन शहा संजय महानोर ओंकार आस्वले, प्राचार्य दिलीप रोंगटे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राजेंद्र राठोड , प्रा.नरेश  खाडगे, पर्यवेक्षक बाबाजी वैद्य, नामदेव बांडे, अनुसया वाळेकर.धिंदळे, मंगल आरोटे, महेश पाडेकर ,यादव कोटकर, सुनिता गुंजाळ ,मुणाली शहाजान, दिपाताई देशमुख, शिवाजी बुरके ,अनिल खाडे, चंदू भोईर ,रवींद्र मेंगाळ आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिला विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
स्वर्गीय चंद्रकांत अनंत म्हात्रे यांच्या स्मृतींना उजाला मिळावा तसेच त्यांच्या स्मृती कायम चिरंतन राहाव्या या उद्देशाने भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, यांच्या तर्फे तसेच धर्मसेवक डॉ.सोन्या काशिनाथ पाटील यांच्या सहकार्याने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी येथील विद्यालयाच्या प्रांगणात आदिवासी दुर्गम भागातील 40 गावच्या 200 गरीब गरजू अशा महिलांना साडी वाटप व 700 शालेय विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजनाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच दिलीपराव भांगरे होते.
कदाचित हा कार्यक्रम पंधरा दिवस अगोदर घेतला असता तर आज मला या भगिनींची भेट झाली नसती त्यामुळे मी सर्व आयोजकांचे आभार मानतो, कारण आमच्याकडे सध्या कापणीचे काम व नव्याने भात पेरणे सुरू असल्याने महिलांना एकत्र करणे मोठे जिंकरीचे काम आहे. या शाळेत मी पहिल्यांदाच आलो आहे व आज योगायोग असा आहे, की, संविधान दिन ही आज आहे, बाबासाहेबांनी शिक्षणाचा मुलमंत्र दिला, मात्र ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या बागा संपूर्ण देशभरात फुलविल्या,
प्रयोग शाळेबरोबरच या शाळेत स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्याचं काम मी येणार्‍या काळात करेन , व  या ठिकाणी उपस्थित असलेले दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉक्टर किशोर पाटील व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे तसेच माझे  जीवस्त, कंठस्त, मित्र डॉक्टर विश्वास आरोटे या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो असे यावेळी आमदार किरण लहामटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,
ज्याप्रमाणे मुंबईमध्ये आपण अनेक संस्थानी एकत्र येऊन कोरोना काळात जे कार्य केले ते खरंच कौतुकास्पद आहे व असेच कार्य यापुढे आपल्या हातून घडावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्याचबरोबर कोरोना काळात आम्हीही खारीचा वाटा उचलण्याचे काम आमच्या विभागात केले आहे असे अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना प्रथम नागरिक दिलीप भांगरे यांनी सांगितले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत त्यामध्ये अनेक संस्था देखील जोडल्या गेल्या आहेत व या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असताना
आम्ही पोस्टमन ची भूमिका साकारण्याचे काम करत असतो असे मनोगत व्यक्त करताना ह.भ.प. डॉ.विश्वास आरोटे यांनी सांगितले, त्याचबरोबर मी ज्या पेपरमध्ये काम करत होतो त्या पेपरचे संपादक करण्याचे काम आमचे सहकारी पत्रकार संघाचे कोकण विभाग हे सचिव तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉक्टर किशोर पाटील यांनी केले  हे मी आवर्जून सांगू इच्छितो असेही त्यांनी शेवटी सांगितले, राजकारणापेक्षा आम्ही समाजकारणाचे व्यासपीठ तयार करून गोर, गरीब, गरजू , अंध,अपंग, मजूर,कामगार, विधवा महिला,
यांच्यापर्यंत  मदत पोहोचवण्याचे काम करत असतो, आज संविधान दिन, शहीद दिन, व साड्या वाटप कार्यक्रम असा त्रिवेणी संगम एकत्र आल्याने कार्यक्रमाचे स्वरूप बदलून गेले असे यावेळी संपादक डॉक्टर किशोर पाटील यांनी सांगितले, आर एस पी कमांडर तथा मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख डॉक्टर मनीलाल रतिलाल शिंपी यांनी मार्गदर्शन करून आदिवासी गीत गाऊ आदिवासी महिलांचे मनोरंजन केले, मात्र कार्यक्रमापूर्वी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यास त्यांनी सांगितले,मानव सेवा हीच ईश्वर सेवा व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून आम्हाला तुमच्यापर्यंत पोचता आले हे आम्ही आमचे भाग्य समजतो  व ज्या ज्या वेळी मदत लागेल त्यावेळी मी माझ्या परीने मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे यावेळी भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन यादव कोटकर यांनी केले, हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे व मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment