नगर शहर शंभर टक्के कचरा मुक्त करुया ः उपमहापौर गणेश भोसले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 30, 2022

नगर शहर शंभर टक्के कचरा मुक्त करुया ः उपमहापौर गणेश भोसले.

 नगर शहर शंभर टक्के कचरा मुक्त करुया ः उपमहापौर गणेश भोसले.

मनपाच्यावतीने कोठी रस्ता परिसरात राबविले स्वच्छता अभियान.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील नागरिकांनी घंटागाडी मध्येच आपला कचरा टाकावा जेणेकरून नगर शहर हे 100% कचरामुक्त होईल या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य ही सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल. अहमदनगर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम प्रामाणिकपणे करत आहे मात्र काही नागरिक स्वच्छता केल्यानंतर त्या ठिकाणी कचरा आणून टाकण्याचे काम करत आहेत. तरी नागरिकांनीच स्वच्छतेबाबत जनजागृती करावी लवकरच महापालिका रिक्त असलेले सफाई कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. तरी स्वच्छता अभियानाला नागरिकांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले. आज मनपाच्या वतीने कोठी रस्ता परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
नगर शहरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तीस तारखेला आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे या माध्यमातून स्वच्छ, सुंदर शहराची संकल्पना राबवली जात आहे यासाठी नागरिकांच्या सहकार्याची खरी गरज आहे.
कोठी रोड परिसरामध्ये मनपा ने राबविलेल्या स्वच्छता अभियानात माती, दगड, गवत याचबरोबर अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मा.नगरसेवक संजय चोपडा, घनकचरा विभाग प्रमुख डॉ.शंकर शेडाळे, अतिक्रमण विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, विभाग प्रमुख नाना गोसावी, स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment