महाराष्ट्र केसरीसाठी पारनेर मधील शिवछत्रपती कुस्ती संकुलनाच्या 10 मल्लांची निवड.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 30, 2022

महाराष्ट्र केसरीसाठी पारनेर मधील शिवछत्रपती कुस्ती संकुलनाच्या 10 मल्लांची निवड..

 महाराष्ट्र केसरीसाठी पारनेर मधील शिवछत्रपती कुस्ती संकुलनाच्या 10 मल्लांची निवड..

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मल्लांकडून मोठ्या अपेक्षा, खुल्या गटातून पै. योगेश पवार यांना संधी. : पै. युवराज पठारे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटात पारनेर येथील शिव छत्रपती कुस्ती संकुलनाचा मल्ल योगेश पवार (उपमहाराष्ट्र केसरी) याने नेत्रदीपक कुस्त्या करून पुढील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले तसेच इतर सर्व निवड झालेल्या  मल्लांनी रोमहर्षक कुस्त्या करत आपल्या वजनगटात स्थान निश्चित केले असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एकाच तालमीच्या 10 मल्लांची  निवड झाली ही खूप अभिमानास्पद बाब असल्याचे पारनेरच्या शिवछत्रपती कुस्ती संकुलन अध्यक्ष नगरसेवक पै.युवराज पठारे यांनी व्यक्त केलं आहे.
65 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तथा महाराष्ट्र केसरी अधिवेशनासाठी जिल्हा निवड चाचणी गादी व माती विभागातील स्पर्धा अकोले येथे पार पडल्या. गादी विभाग- पै. अभिजित वाघुले, पै. ऋषीकेश उचाळे, पै. आकाश घोडके, पै. ऋषीकेश लांडे, पै. तुषार सोनवणे, चेतन रेपाळे, पै.अनिल ब्राम्हणे, माती विभाग - पै.अक्षय औटी, पै. अनिल लोणारे, आकाश चव्हाण, महाराष्ट्र केसरी गट - पै. योगेश पवार निवड झालेल्या मल्लांना नगरसेवक पै. युवराज पठारे, कवडगावचे सरपंच पै. धनंजय खरसे, हरियाणा येथील छखड कुस्ती कोच पै. संदीप, छखड कुस्ती कोच पै. मनीष, पै. सुनील खोडदे यांचे मार्गदर्शक लाभले.
कुस्ती स्पर्धेचे नियोजन अकोला तालीम संघाचे अध्यक्ष बबलू धुमाळ यांनी योग्यरित्या पार पाडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड हे होते. यावेळी अकोल्याच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवडी, वैष्णवी धुमाळ (सभापती,बांधकाम समिती),अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान वैभव दादा लांडगे ,अहमदनगर जिल्हा कुस्ती मल्लविद्याचे अध्यक्ष पै.मिलिंद जपे, पै. बंडूशेठ शेळके, पै. घोडके मामा, पै. काकासाहेब शेळके, पै. एकनाथ उचाळे, पै. साहेबराव पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

अकोले येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये 10 मल्लांची निवड झाली एकाच तालमीतील महाराष्ट्र केसरी साठी 10 मल्लांची निवड होणे हा एक इतिहास आहे नक्कीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून मल्ल चांगली कामगिरी करतील पै.योगेश पवार यांची सुद्धा खुल्या गटात निवड झाल्यामुळे पवार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

- पै. युवराज पठारे शिवछत्रपती कुस्तीसंकुल, पारनेर


चपळ चैतन्याने गाजवली अकोल्याची स्पर्धे
  शिवछत्रपती कुस्ती संकुलनचा अवघ्या 18 वर्षांचा मल्ल पै. चेतन रेपाळे याने अतिशय उल्लेखनीय कुस्त्या करून संपुर्ण जिल्ह्यातील उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली. चेतन हा अतिशय चपळ व कौशल्य निपुण असा मल्ल आहे. अतिशय सुरेख कुस्ती करत अकोले येथील स्पर्धा त्याने गाजवली.

No comments:

Post a Comment