मोक्का गुन्ह्यातील फरार दोन आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 30, 2022

मोक्का गुन्ह्यातील फरार दोन आरोपी जेरबंद.

 मोक्का गुन्ह्यातील फरार दोन आरोपी जेरबंद.

एमआयडीसी पोलिसांच्या सापळ्यात सापडले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द केलेले व मोक्का गुन्हयात फरार असणार्‍या किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे (वय 24 वर्ष रा. देहरे) व महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे (वय 28 वर्ष रा.विळद) या दोन्ही आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी देहरे परिसरात सापळा लावून जेरबंद केले आहे. या दोन्ही सराईत आरोपींवर दौंड, नगर तालुका, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हयातील मोक्का लागलेले आरोपी नामे किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे वय 24 वर्ष रा. देहरे ता. जि. अहमदनगर महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे वय 28 वर्ष रा. विळद ता. जि. अहमदनगर यांचा मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने पुर्वी मंजुर केलेला जामीन रदद केला होता. त्यावर त्यांना सदर गुन्हयात मोक्याच्या तपासाच्या अनुशंगाने ताब्यात घेणे आवश्यक होते. त्यावरुन सदरचे आरोपी हे देहरे परीसरात आल्याची गोपनीय माहिती सपोनि युवराज आठरे यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन देहरे परीसरात सापळा रचुन सदर आरोपींना शिताफीने पकडले. सदरची कामगिरी राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली युवराज आठरे, योगेश चाहेर, साबीर शेख, सुरज देशमुख, जयशिंग शिंदे, किशोर जाधव मोबाईल सेलचे प्रशांत राठोड, नितीन शिंदे यांचे पथकाने केलेली आहे.

No comments:

Post a Comment