बुर्‍हाणनगरमधील जगदंबा देवी मंदिराची मालकी ट्रस्टकडे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

बुर्‍हाणनगरमधील जगदंबा देवी मंदिराची मालकी ट्रस्टकडे.

 बुर्‍हाणनगरमधील जगदंबा देवी मंदिराची मालकी ट्रस्टकडे.

जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बुर्‍हाणनगर मधील भाविकांचे श्रद्धास्थान असणारी जगदंबा देवी मंदिरातील विश्वस्त व्यवस्था रद्द करून हे मंदिर खाजगी असल्याचे जाहीर करावे ही मंदिराची पूजा व देखरेख करणार्‍या भगत कुटुंबीयांची मागणी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली असून या मंदिराची मालकी ट्रस्टकडे सोपविण्याचा आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी दिला आहे.
राज्यभरातील भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. तुळजाभवानीचे माहेरघर म्हणून या मंदिराची ओळख आहे. मंदिराला धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भगत कुटुंबाकडे मंदिराची देखरेख आणि पूजाअर्चा होती. विश्वस्त व्यवस्था सुरू झाल्यानंतर किसन भगत यांनी अर्ज केला होता. रामदास जाधव व नानाभाऊ तापकिरे यांनी 1980 मध्ये धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज केला. तो 1981 मध्ये मंजूर झाला होता. त्यावर भगत यांनी अहमदनगर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो नामंजूर केला होता. त्यानंतर विश्वस्त व्यवस्था रद्द करून हे मंदिर खासगी असल्याचे जाहीर करावे, असा अर्ज विजय भगतव अर्जुन भगत यांनी दाखल केला होता.
जाधव आणि तापकिरे यांच्या वतीने अ‍ॅड. सुभाष काकडे, अ‍ॅड. सागर गुंजाळ, अ‍ॅड. नरेश गुगळे, अ‍ॅड. सौरभ काकडे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, हे मंदिर भगत कुटुंबीयांचे नसून, गावकर्‍यांचे आहे. याबाबतचे पुरावे त्यांनी सादर केले. देशभरातील महत्त्वाच्या देवस्थानांचे न्यायनिवाडेहो सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून मंदिराची मालकी ट्रस्टकडे सोपविण्याचा आदेश दिला आहे.

No comments:

Post a Comment