मुलगा व मुलीचे नातेवाईक, ब्राह्मण व वर्‍हाडींवर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

मुलगा व मुलीचे नातेवाईक, ब्राह्मण व वर्‍हाडींवर गुन्हा दाखल.

 मुलगा व मुलीचे नातेवाईक,ब्राह्मण व वर्‍हाडींवर गुन्हा दाखल.

शनिशिंगणापूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 17 वर्ष 6 महिने वय असणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा विवाह शनिशिंगणापूर पोलिसांनी रोखला असून मुलीचे आई वडील 21 वर्षांपुढील नवरदेव मुलगा, त्याचे आई वडील, नातेवाईक लग्न विधीपूर्वक लावणारा ब्राह्मण, लग्नात सजावट करणारा, ज्याच्या जागेत लग्न होत होते  त्या जागेचे मालक, लग्नात जेवण बनवणारा आचारी, बाल विवाह होत असून सुद्धा तो थांबवण्यासाठी मदत न करणारे सर्व नागरिक आणि या बालविवाहमध्ये सामील होणारे सर्व लोकांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा 2007 अंतर्गत 9,10,11 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, दिनांक 24 नोव्हेंबर रोजी शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 17 वर्ष 6 महिने अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती पोलीस विभागाच्या डायल 112 वर दिनांक 24 नोव्हेंबर रोजी पोलीस कंट्रोलला समजले होती. ही माहिती ताबडतो शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजय कर्पे यांना दिली. यांनी कोणताही विलंब न करता बालविवाह थांबवण्यासाठी पोलीस पथक सोबत घटनास्थळी धाव घेतली. पण त्यांच्या जाण्यापूर्वीच या अल्पवयीन मुलीचा बालविवाह विधीपूर्वक संपन्न झाला होता. त्यांनी तिथेच शनिशिंगणापूरच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उर्फ बालविवाह प्रतिबंधक अधिकारी दादासाहेब नारायण बोरुडे यांना घटनास्थळी बोलून तेथील पंचनामा करून ताबडतोब संपूर्ण वर्‍हाडी आणि लग्न लावणारे ब्राह्मण यांना शनिशिंगणापूरच्या पोलीस स्टेशनला आणून सर्व विचारपूस करून मुलीला आधार देऊन अल्पवयीन मुलीला या आरोपीच्या ताब्यात न देता त्या मुलीला काळजी आणि संरक्षणाची गरज आणि निवारा आणि त्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी बालकल्याण समिती समोर हजर करून तिला सुरक्षित ठिकाणी तुझ्या शिक्षण पूर्ण होण्यासाठी निवारा मिळवून देणार आहेत. असे शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. विजय कर्पे  यांनी माहिती दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कुठेही बालीभा होत असेल तर किंवा झालेला असेल बालीवा झालेल्या पिढीत बलकावर शारीरिक मानसिक अत्याचार होत असेल तर ताबडतोब ही माहिती चाईल्ड लाईनच्या मोफत 1098 या क्रमांकावर किंवा पोलीस विभागाच्या डायल 112 वर द्यावी   असे आव्हान मा. हनिफ शेख संचालक उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान ,अहमदनगर आणि स्नेहालय च्या वतीने करण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्हा हे एक महाराष्ट्र राज्यातील मोठे खेडे आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात खूप जास्त प्रमाणात बालविवाह होत आहे. बालीवा झाल्याची किंवा थांबवण्यासाठीची मदत चाळीस यांच्या 10 98 वर किंवा पोलीस यांच्या माध्यमातून घेतली जात आहे. पण अनेक वेळा ही माहिती कोणालाच म्हणजे प्रशासनाला किंवा चाईल्ड यांच्यात 98 ला किंवा कोणत्याच हेल्पलाइन कळत पण नाहीये. अहमदनगर जिल्ह्यातील  बालविवाह लावण्याचे प्रकार ग्रामीण आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असून, अशा विवाहांमुळे बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाणही वाढते आहे.

No comments:

Post a Comment