राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर खासदार उदयनराजे आक्रमक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 24, 2022

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर खासदार उदयनराजे आक्रमक.

 राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर खासदार उदयनराजे आक्रमक.

28 पर्यंत राज्यपालांवर कारवाई करा ..अन्यथा

पंतप्रधानांना भेटणार.. भाजपला खा.उदयनराजेंचा इशारा.


पुणे ः
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून छत्रपती उदयनराजे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. राज्यपाल हे सन्मानाचं पद आहे. त्यांना जबाबदारी कळत नसेल तर त्यांना त्या पदावर बसण्याची आवश्यकता नाही. शिवभक्त म्हणून मी परखड मत मांडले आहे. मी याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार आहे. सगळ्या नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. 28 तारखेपर्यंत राज्यपालांवर काय कारवाई करतात ते पाहू असा सूचक इशाराच उदयनराजेंनी भाजपाला दिला आहे.
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले की, आज संपूर्ण जगात, वेगवेगळ्या देशात अनेक योद्धे, राजे होऊन गेले. त्यांच्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात एक फरक आहे तो म्हणजे इतरांनी त्यांचे राज्य वाढवण्यासाठी लढाई केली. तर छत्रपतींनी सर्वसामान्य लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढाई केली. छत्रपतींचं नाव घेतलं तरी अंगात ताकद निर्माण होते. बारकाईनं आपण विचार केला तर त्यावेळेस सुद्धा एक दुरदृष्टी विचार शिवरायांनी मांडला. भगतसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज होते असंही उदयनराजे म्हणाले.
सर्वधर्म समभाव, स्वराज्याची संकल्पना हा विचार त्यावेळी छत्रपतींनी मांडला. प्रत्येक जाती धर्मातील लोकांचा शिवरायांनी सन्मान केला. महिला, मुले वडीलधारी लोकांचा सन्मान केला. इतिहास पाहिला तर त्यातून बरेच काही घेण्यासारखं आहे. या वक्तव्याने चीड, राग येतो. या संपूर्ण जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारत देश आहे. या भारतात विविध जातीधर्मातील लोकांचे वास्तव्य आहे. या सगळ्यांना एकत्र ठेवायचा असेल तर सर्वधर्मसमभाव हा विचार छत्रपतींनी मांडला. त्याच विचाराच्या आधारावर देश अखंड राहू शकतो असं उदयनराजेंनी सांगितले.
मी पणा शिवरायांच्या काळात नव्हता. आज मी पणा वाढलाय. व्यक्ती केंद्रीत झालं आहे. छत्रपतींचे नाव देणे, पुतळे उभारणं हा सन्मान आहे पण त्यांचे विचार आचरणात आणणार की नाही? देव कोणी पाहिला नाही पण देवाच्या रुपाने एक युगपुरुष जन्माला येतो ते छत्रपती. अशा राजाची अवहेलना केली जाते. छत्रपतींचा अवमान करण्याचं धाडस निर्लज्ज लोक करतात. छत्रपतींचा विसर कसा पडू शकतो असं उदयनराजेंनी विचारलं. राज्यपालांच्या विधानाचा राग सर्वसामान्य लोकांना आलाय. नितीन गडकरी, शरद पवार हे त्या व्यासपीठावर होते. राज्यपालांच्या विधानाचा विरोध व्यासपीठावर करायला हवा होता असंही म्हटलं.

No comments:

Post a Comment