स्थानिक गुन्हे शाखेचे राहुरी व कोपरगाव मधील दारू व जुगार अड्ड्यांवर छापे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

स्थानिक गुन्हे शाखेचे राहुरी व कोपरगाव मधील दारू व जुगार अड्ड्यांवर छापे.

 स्थानिक गुन्हे शाखेचे राहुरी व कोपरगाव मधील दारू व जुगार अड्ड्यांवर छापे.

राहुरीतील गावठी दारूचा नाश.. कोपरगाव जुगार अड्ड्यातील 23 लाखाचा मुद्देमाल जप्त.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील अवैद्य गावठी हातभट्टी अड्ड्यांवर तसेच कोपरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे. राहुरीतील छाप्यात 2 आरोपींवर कारवाई करीत 80 हजार रुपये किंमतीची अवैध्य गावठी हातभट्टीची साधने 14000 लिटर कच्चे रसायन व 100 लिटर तयार दारू जप्त करून या दारूचा नाश केला आहे. कोपरगाव येथील अवैद्य जुगार अड्ड्यावरील 28 आरोपींवर कारवाई करीत 23 लाख 35 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी,राहुल सोळंके, रोहित येमुल, आकाश काळे व सागर ससाणे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.24/11/2022 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 02 ठिकाणी छापे टाकुन एकुण 80,000/रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 1,400 लि.कच्चे रसायन,100 लि.गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे 02 आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
या कारवाईची सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब, पोलीस यांनी अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी जिल्ह्यातील जुगार व मटका अशा अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील दिनकर मुंडे, सोपान गोरे, मनोजर शेजवळ, विष्णु घोडेचोर, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, भिमराज खर्से, लक्ष्मण खोकले, रणजीत जाधव, योगेश सातपुते, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशाना नेमुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार कोपरगांव, शिर्डी व राहाता परिसरात फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, टाकळी फाटा येथील धोंडीबानगर, ता. कोपरगांव येथे योगेश बन्सी मोरे याचे इमारतीचे टेरेसवर काही इसम पैशावर खेळला जाणारा तिरट नावाचा तीन पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन खात्री करुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी विभाग व कोपरगांव शहर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवुन कारवाई करणे बाबत पथकास सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी विभाग येथील सचिन जाधव, कुर्‍हे व कोपरगांव शहर पोलीस स्टेशन मधील रोहिदास ठोंबरे व स्टाफ यांना बातमीतील हकिगत सांगुन पंचनामा करणे करीता अवश्यक साधने व पंचाना सोबत घेवुन कारवाई करीता सोबत येणे बाबत कळविले. पथक सर्व साधने व पंचाना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी काही अंतरावर वाहने उभी करुन इमारतीचे जिन्यातुन टेरेसवर गेले असता इमारतीचे टेरेसवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी काही इसम गोलाकार बसलेले दिसले. त्यांचे हातामध्ये तीन पत्ते दिसले तसेच मध्यभागी काही पत्ते व पैसे दिसल्याने पथकाची खात्री होताच सर्वांना जागेवर बसण्यास सांगुन ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये रोख रक्कम व मोबाईल फोन मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत तसेच आरोपींकडे इमारतीचे समोर पटांगणात लावलेल्या वाहनांबाबत विचारपुस करता त्यांनी आम्ही सदर वाहने जुगार खेळण्यासाठी आनल्याचे सांगितल्याने ती जप्त केली कारवाई दरम्यान 28 आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे अंगझडती मध्ये 2,05,670/- रु. रोख रक्कम, विविध कंपनीचे 30 मोबाईल फोन, 04 चारचाकी व 07 दुचाकी वाहने असा एकुण 23,35,370/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द कोपरगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 397/2022 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे पोना/376 शंकर संपत चौधरी ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, स्वाती भोर,अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर विभाग, अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment