जिल्ह्यात बालचित्रकला स्पर्धेत अभिरुची श्रीमंदिलकर तृतीय. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 25, 2022

जिल्ह्यात बालचित्रकला स्पर्धेत अभिरुची श्रीमंदिलकर तृतीय.

 जिल्ह्यात बालचित्रकला स्पर्धेत अभिरुची श्रीमंदिलकर तृतीय.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः महाराष्ट्र कला संचालनालय व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे आज बाल दिनानिमित्त बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया तसेच शिक्षणाधिकारी अशोक कडूस साहेब त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.  जिल्ह्यातून चारही गटांमिळून 59 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सेनापती बापट विद्यालय पारनेर मधील कुमारी अभिरुची कैलास श्रीमंदिलकर हिला जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक मिळाला त्याबद्दल तिचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया ,स्कूल कमिटी चेअरमन जयश्रीताई औटी व सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय पडोळे पर्यवेक्षक अरण्य मॅडम व सर्व शिक्षक यांनीही तिचे कौतुक केले तिला मार्गदर्शन करणारे श्री गाडे सर व श्रीमंदिरकर सर यांचेही कौतुक करण्यात आले.

No comments:

Post a Comment