सहाय्यक फौजदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 5, 2022

सहाय्यक फौजदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

सहाय्यक फौजदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्याअहमदनगर - सहाय्यक फौजदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना दसर्‍याच्या दिवशीच घडली आहे. बेलवंडी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सहायक फौजदार सुनील धोंडिबा मोरे वय अंदाजे 50 यांनी श्रीगोंदा शहरातील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे .मोरे हे परिवारासह श्रीगोंदा येथे राहात होते. ते एक महिन्यांपासून मेडिकल रजेवर असल्याचे समजते.

आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यांनी याआधी नगर एमआयडीसी व तोफखाना पोलीस स्टेशन येथे काम केले आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी एका पोलिस कर्मचार्‍याने अशी आत्महत्या केल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here