हिवरे कोरडा येथील मळगंगा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 29, 2022

हिवरे कोरडा येथील मळगंगा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात.

 हिवरे कोरडा  येथील मळगंगा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात.


टाकळी ढोकेश्वर : 
शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे आदिमाया शक्ती मळगंगा देवीचा नवरात्र उत्सव असतो नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कारण कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. नवरात्रीच्या उत्सवात देवींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भक्तीमय वातावरणामध्ये दरवर्षी या ठिकाणी किर्तन भजन प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम असतात. हिवरे कोरडा येथील आदिमाया शक्ती हे एक जागृत देवस्थान आहे.  हिवरे कोरडा  पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी दर्शनासाठी व नगर , पुणे मुंबई, या ठिकाणाहून भाविक भक्त कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. नवरात्र उत्सव सुरू झाला आहे सलग नऊ दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. भाळवणी काळकुप, माळकुप ,गोरेगाव भनगडेवाडी या ठिकाणाहून भाविक भक्त संध्याकाळी आरतीच्या वेळेस बहुसंख्येने उपस्थित असतात,
येथील ग्रामस्थ व भाविक भक्तांचे देवस्थान साठी नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे व ते देवस्थानच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करत आहेत. हिवरे कोरडा परिसरातील ग्रामस्थ हे नवरात्र उत्सवामध्ये मळगंगा  मंदिरामध्ये येऊन भक्तिमय वातावरणामध्ये देवीची सेवा करतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here