बाजार समितीच्या कमानीसमोरील चौकात मोठा खड्डा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 18, 2022

बाजार समितीच्या कमानीसमोरील चौकात मोठा खड्डा.

बाजार समितीच्या कमानीसमोरील चौकात मोठा खड्डा.

ऋषी गंधाडे व तुषार औटी यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानी शेजारील खड्डा बुजविण्याची मागणी.


पारनेर -
बसस्थानक ते पारनेरकडे जाणाऱ्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीसमोरील चौकात मोठा खड्डा पडला आहे. या खड्डयात पावसाचे पाणी साठते. त्यामुळे तो दिसत नाही. या खड्ड्यात आतापर्यंत अनेक जण पडले असून, तो तातडीने बुजवावा, अशी मागणी तरुणांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी एका मुलाची सायकल या खड्डयात आदळल्यामुळे त्याचा हात मोडला. येथे रोज किरकोळ अपघात होतात. हा खड्डा तातडीने बुजवावा, अशी मागणी ऋषी गंधाडे व तुषार औटी यांनी खड्डयात रोप लावून केली. तसेच येथे बांधकाम विभागाचे अधिकारी आल्याशिवाय आम्ही हे रोप काढणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतल्याने हे रस्त्यावर लावलेले रोप पहाण्यासाठी दिवसभर शहरातील अनेक जण येत होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here