बनावट डॉक्टर गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 8, 2022

बनावट डॉक्टर गजाआड.

 बनावट डॉक्टर गजाआड.

‘तो’ जनावरांची औषधे रुग्णांना देत होता.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रुग्णांना जनावरांची औषधे देणार्‍या राजेंद्र सदाशिव जंजाळ (रा.कारंजा रस्ता बीड) या बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश पाथर्डी तालुका आरोग्य विभागाने केला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याचे सर्टिफिकेटही बनावट आढळून आले आहे.
एका औषध विक्रेत्या दुकानदाराने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील करंजीलगत असलेल्या खंडोबाची वाडी येथे राजेंद्र जंजाळ याने तीन दिवसांपूर्वी दवाखाना सुरू केला. त्याच्या दवाखान्यात जनावरांना देण्यात येणारी औषधे व इंजेक्शनचा साठा होता. तीन दिवसांपासून तो रुग्णांवर उपचार करत होता. जंजाळ याने दिलेली औषधाची चिठ्ठी घेऊन एक रुग्ण करंजी येथील एका मेडीकल दुकानात गेला. दुकानदाराने ही चिठ्ठी पाहताच या वर लिहिलेली औषधे ही जनावरांची असून तुम्ही ती घेऊ नका असा सल्ला रुग्णाला दिला. त्यानंतर या दुकानदाराने या प्रकारची माहिती करंजीच्या आरोग्य उपकेंद्राचे अधीक्षक डॉ. दिलीप तांदळे यांना कळवली. तांदळे यांनी जंजाळ याला ताब्यात घेत तिसगाव येथील उपकेंद्रात आणत या प्रकरणाची माहिती तालुका आरोग्य अधिकारी व तिसगाव उपकेंद्राचे अधीक्षक डॉ. बाबासाहेब होडशील यांना दिली. होडशील यांनी जंजाळचे डॉक्टरी सर्टिफिकेट पाहिले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. या संदर्भात डॉ. बाबासाहेब होडशील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत जंजाळ याला बेड्या ठोकल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here